आर. सी. पटेल अनुदानित आदिवासी आश्रमशाळेचे असलीला सोत्साहात उद्घाटन

 




आर. सी. पटेल अनुदानित आदिवासी आश्रमशाळेचे असलीला सोत्साहात उद्घाटन

शिरपूर दि.१८(प्रतिनिधी हिराभाऊ कोळी):, धुळे एज्युकेशन सोसायटीच्या आर. सी. पटेल अनुदानित आदिवासी आश्रमशाळेचे असली, ता. शिरपूर येथे आज उदघाटन केले.

आदिवासी मुलांना चांगल्या शिक्षणासाठी अनेक योजना आमच्या काळात राबविण्यात आल्या. आता अशा आश्रमशाळा सुद्धा शासनामार्फत उभारण्याची नितांत गरज आहे!

श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ, मुंबईच्या मुकेशभाई आर. पटेल सैनिकी शाळा, निवासी शाळा तसेच इनडोअर स्टेडियमचे तांडा, ता. शिरपूर येथे आज उदघाटन केले. अमरीशभाई पटेल, गिरीश महाजन, जयकुमार रावल आदी उपस्थित होते.

अमरीशभाई पटेल यांनी शिरपूरला उद्योगनगरी आणि विद्यानगरीत परावर्तित केले.

नेत्याला दृष्टी असावी लागते, तरच तो विकासात भरीव योगदान देऊ शकतो. राजकारणात काम करतानाही विविध संस्थांचा दर्जा राखता येणे, हे अनोखे कौशल्य आहे आणि ते अमरीशभाईंनी साधले आहे.

शिरपूर-60 हा सैनिकी शाळेतील अतिशय स्तुत्य आणि पथदर्शी उपक्रम आहे. शिक्षणातून स्वाभिमान आणि आत्मविश्वास मिळतो, तो मला या विद्यार्थ्यांमध्ये पाहता आला. प्रत्येक गोष्टीत नियोजन आणि त्यामागे ठोस संकल्पना या प्रत्येक संस्थांमध्ये दिसून येतो. म्हणूनच हे उपक्रम वेगळे आहेत.

केवळ शिक्षण नाही तर उत्तम खेळाडू निर्माण करण्याचे कामही येथे साधले जाते आहे. अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये आहेत. एकूणच सर्वांगिण विकासावर भर दिला जात आहे. येणार्‍या काळात काही चांगले ऑलिम्पिकपटू सुद्धा येथून घडतील. या सर्व उपक्रमांना मी अनेकानेक शुभेच्छा देतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने