*उद्योगपती आ. अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय ऑनलाईन इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा*
शिरपूर दि. १२(प्रतिनिधी): आर.सी. पटेल प्राथमिक शाळेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही१४ सप्टेंबर रोजी आ. अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय ऑनलाईन इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणातूनच इंग्रजी विषयातील गोडी वाढावी म्हणून दरवर्षी तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत.
सदर स्पर्धेसाठी प्रत्येक शाळेतून व गटातून फक्त दोन विद्यार्थीसहभाग घेऊ शकतात. विद्यार्थ्यांचे सदर व्हिडीओसाठी २ ते ३मिनिटांची वेळ राहील. शाळांना नोंदणी करण्यासाठीऑनलाईन गुगल फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले होते. यास्पर्धेत यावर्षी आतापर्यंत जवळपास ५५ प्राथमिक शाळांनीसहभाग नोंदवला आहे.
सदर स्पर्धा ही ग्रामीण भागातील शाळा, शहरी भागातीलशाळा, आश्रम शाळा, इंग्लिश मीडियम शाळा व खुला गट अशापाच गटात घेण्यात येते. विद्यार्थ्याला कोणत्याही एकाच गटातूनसहभाग नोंदवता येणार आहे. खुला गटासाठी पाच विषयांपैकीस्पर्धेच्या दिवशी एक विषय फोनवरून देण्यात येईल, त्या विषयावर आधारित व्हिडीओ रेकॉर्ड करून पाठवावा लागणारआहे.सदर स्पर्धा नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष तथा संस्थेचे कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाईपटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकररावचव्हाण, सीईओ डॉ. उमेश शर्मा यांच्या मार्गदर्शखाली घेण्यातयेते. या स्पर्धेत तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभागघेण्याचे आवाहन मुख्याध्यापक सी. डी. पाटील यांनी केलेआहे.