*हस्ती स्कूल व्हर्च्युअल क्लास द्वारा ' शाडू मातीपासून श्री गणेशा-ट्री गणेशा इको फ्रेण्डली मूर्ति साकारणे ' कार्यशाळा संपन्न...हस्ती स्कुलमध्ये फिजीकल शिक्षणासह व्हर्च्युअल शिक्षणाचाही मेळ -चेअरमन श्री कैलास जैन*





 स्कूल व्हर्च्युअल क्लास द्वारा ' शाडू मातीपासून श्री गणेशा-ट्री गणेशा इको फ्रेण्डली मूर्ति साकारणे ' कार्यशाळा संपन्न...हस्ती स्कुलमध्ये  फिजीकल शिक्षणासह  व्हर्च्युअल शिक्षणाचाही मेळ -चेअरमन श्री कैलास जैन*


*दोंडाईचा दि.१२(प्रतिनिधी)-*  हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत हस्ती गृप ऑफ स्कूल,दोंडाईचा तर्फे व शालेय समिती चेअरमन कैलास जैन यांचे मार्गदर्शनाने ऑनलाइन व्हर्च्युअल क्लासेस द्वारा श्री गणेश उत्सव पार्श्वभूमिवर शाडू माती पासून श्री बाप्पांची इको फ्रेण्डली मूर्ति साकारणे कार्यशाळेचे आयोजन दि. ७ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले होते. 


हस्ती स्कूलचे व्हर्च्युअल शिक्षण हे, जसे फिजीकल स्कूल काळात विद्यार्थ्यांच शिक्षण सुरू असते; त्याप्रमाणेच व्हर्च्युअल शिक्षणही सुरू आहे. हेच हस्ती शाळेचे वैशिष्ट्य आहे.


विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा. त्यांनी शाडू माती किंवा काळ्या मातीपासून सुबक, सुंदर व मनोहारी इको फ्रेण्डली श्री बाप्पांची मूर्ति साकारावी, आणि आपल्या घरी स्वत: तयार केलेल्या मूर्तिची प्रतिष्ठापना करून मूर्तिचे विसर्जनही घरीच करावे; तसेच पर्यावरण संवर्धन बाबत जाणीवा निर्माण होऊन प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जल प्रदूषण थांबवावे; ह्या उद्देशाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.


या कार्यशाळेचे वैशिष्ट म्हणजे " श्री गणेशा - ट्री गणेशा ! " या संकल्पने नुसार माती पासून श्री गणेश मूर्ती साकारतांना  विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या फुलझाडाचे, फळझाडाचे अथवा कोणत्याही झाडाचे ' बी ' घेऊन;   त्या ' बी ' चे रोपण मुर्तीत करायचे होते. अर्थात अशा श्री गणेश मुर्तिचे  विसर्जन झाल्यानंतर, मूर्तित केलेल्या  '  बी ' रोपणाला अंकुर आलेला असेल. ते अंकुर फुटलेले ' बी ' मातीसह घराच्या अंगणात, परिसरात अथवा जिथे वृक्षारोपण करायचे असेल अशा ठिकाणी विद्यार्थी वापर करू शकतात.


सदरच्या व्हर्च्युअल कार्यशाळेचे प्रास्ताविक समन्वयक भुषण दिक्षीत यांनी केले. यानंतर या कार्यशाळेत हस्तीचे कला शिक्षक मनोहर यादव यांनी विद्यार्थ्यांना शाडू पासून मूर्ती कशी तयार करावी ? मातीचा गोळा बनविण्यासाठी पाणी किती प्रमाणात घ्यावे ? ओल्या मातीच्या गोळा किती व केवढा गोळा घ्यावा ? या गोळ्यांना श्री गणेशाचे हात, पाय, सोंड, दात, मुकुट तसेच पोटाच्या आकारात आवडत्या फुलझाडाचे अथवा फळझाडाचे किंवा वृक्षाचे ' बी ' कसे रोपण करावे ? पितांबर, शेला, गणेशाचे अलंकार यांना कसा आकार द्यावा ? याविषयी प्रात्यक्षिकांसह ऑनलाइन व्हर्च्युअल क्लास द्वारा मार्गदर्शन केले. तसेच श्री गणेश मूर्ति सुकल्यावर मूर्तिला सुंदर व आकर्षक आणि मनोहारी रूप साकार करण्यासाठी कोणता रंग कसा वापरावा ? रंग लेपन कसे करावे ? रंग संगती कशी असावी ? याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. 

सोबतच श्री गणेश चतुर्थीला आपल्या घरी स्वत: तयार केलेल्या या श्री बाप्पांच्या इको फ्रेण्डली मूर्तिची स्थापना करावी; व मूर्तिचे विसर्जनही घरीच करावे. व ' मूर्तित रोपण केलेला अंकुरलेला  ' बी ' चा मातीचा गोळा घेऊन; त्याचे अंगणात अथवा परिसरात रोपण करावे. याबाबतही आवाहन करण्यात आले. या कार्यशाळेत इ. ३ री. ते इ. १० वी. चे विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या घरीच व्हर्च्युअल मार्गदर्शनानुसार शाडू माती व काळ्या माती पासून स्वत: इको फ्रेण्डली श्री बाप्पांच्या सुबक व सुंदर गणेश मूर्ति आनंदाने साकारल्या.

वरील इको फ्रेण्डली श्री बाप्पांची मूर्ति साकारणे व्हर्च्युअल कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी कला विभाग प्रमुख मनोहर यादव व प्रविण गुरव यांनी परिश्रम घेतले. 

हस्ती स्कूल येथे दरवर्षी नियमितपणे अशा स्वरूपाच्या कार्यशाळांचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी केले जाते. याद्वारा विद्यार्थ्यांमधील सुप्त कला गुणांना व सृजनशीलता, नवनिर्मितीला चालना मिळते. सोबतच त्यांचेवर पर्यावरण संवर्धन जाणीवांचे संस्कार रूजविले जातात. यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासास साहाय्य होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने