राज्य शासनाने आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द केलेला निर्णय मागे घेऊन लवकरात लवकर परीक्षा घ्याव्या ..!! भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुरज देसले यांची मागणी..!!

 


राज्य शासनाने आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द केलेला निर्णय मागे घेऊन लवकरात लवकर परीक्षा घ्याव्या ..!! भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुरज देसले यांची मागणी..!!

       शिंदखेडा दि.२७(प्रतिनिधी रवि शिरसाठ]   राज्य शासनाने आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द केलेला निर्णय मागे घेऊन लवकरात लवकर परीक्षा घ्याव्यात अशी मागणी भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुरज देसले यांनी केली आहे. आरोग्य  विभागाच्या परीक्षा राज्य सरकारने परीक्षेला काही तास शिल्लक असताना परीक्षा रद्द केल्या हे अतिशय बेजबाबदार पणाचे लक्षण आहे . विद्यार्थ्याचा पोरखेळ या सरकारने करन ठेवला आहे . आरोग्य मंत्र्यांच्या एका साध्या मीडिया बाईटच्या माध्यमातून फक्त दिलगिरी व्यक्त करून हा विषय संपणार नाही. असेही त्यांनी म्हटले आहे.


     गोरगरीब विद्यार्थी कोणा कडून उसनवार पैसे घेऊन काही तरी व्यवस्था करून परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत. तरी त्याची भरपाई देण्यात यावी. तसेच आरोग्य विभागातील परीक्षा शासनाने ऐनवेळी न काही सूचित करता रद्द करण्यात आल्या या  निर्णयांच्या विद्यार्थ्यांवर व त्याच्या शैक्षणिक जीवनावावर खूप मोठया प्रमाणावर परिणाम होवु शकतो. याची दखल घेऊन राज्य शासनाने हा निर्णय मागे घेऊन लवकरात लवकर परीक्षा घेण्यात याव्या व विद्यार्थ्यांच्या जीवणावर होणारी हाणी थांबवावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुरज देसले यांनी तहसीलदार यांना पत्र देऊन केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने