**भाजपा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरांना धुळे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचा महिलांच्या बाबतीत तोंड सांभाळून बोला नाहीतर..*
धुळे दि.१४(प्रतिनिधी)
*भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शिरूरमधील (पुणे) जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल व महिलांबद्दल जे आक्षेपार्ह विधान केले. ते त्यांची व सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या भाजपाची बौद्धिक दिवाळखोरी व बौद्धिक दारिद्र जगजाहीर करणारी आहे. बऱ्याबोलाने प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महिलांची जाहीर माफी मागावी, नाही तर त्यांना काळे फासून रंगविल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या धुळे जिल्हा महिला आघाडीने दिला आहे.*
*आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त १३ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या एका राज्यव्यापी कार्यकर्ता मेळाव्यात प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महिलांबाबत जे आक्षेपार्ह विधान केले आहे. त्याचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष, धुळे जाहीर निषेध करतो.* *तसेच ते धुळे जिल्हा दौऱ्यावर कधी आलेच तर राष्ट्रवादी महिला काँग्रेस दरेकर यांचे थोबाड काळे फासून रंगविल्याशिवाय राहणार नाही.* *सत्त्ता गेली की कसे वैफल्य येते हेच भाजपा आणि या पक्षाचे नेते असलेल्या दरेकर यांच्या विधानावरून लक्षात येते. भाजपा व दरेकर या वैफल्यातून ताळतंत्र, पुरोगामी महाराष्ट्राला साजेसा सुसंस्कृतपणा सोडून आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवताना महिला वर्गाचाही आदर राखत नाही असे दिसून येत आहे. यावरून दरेकर यांच्या रूपाने त्यांच्या बेताल- आक्षेपार्ह विधानावरून भाजपा जो वैचारिकतेचा, सुसंस्कृतपणाचा आव आणत असते तो बेगडी व दिखाव्यापुरताच असतो असे स्पषपणे दिसून येत आहे. त्यामुळे दरेकरांनी मनाची नाही पण जनाची लाज राखून लवकर जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांना काळे तर फासूच शिवाय त्यांच्या निवासस्थानी दररोज पोष्टातून तार (टेलिग्राम) किंवा स्पीड पोस्टने निषेधाची पत्र पाठवत राहू. धुळे जिल्हा व महाराष्ट्रातून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शेकडो महिला कार्यकर्त्यां अशी पत्र पाठवतील, असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांनी दिला आहे.*
*जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, शहराध्यक्षा सरोज कदम, युवती जिल्हाध्यक्षा हिमानी वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष मालती पाडवी, जिल्हा कार्याध्यक्ष सरोज संजीवनी पाटील, शहर कार्याध्यक्ष तरूणा पाटील, विधानसभा अध्यक्ष धुळे तालुका माधुरी पाटील, जिल्हा सरचिटणीस सरोज पवार, युवती कार्याध्यक्षा चेतना पाटील, शारदा भामरे,रेखा सूर्यवंशी, वनिता गरुड व वर्षा सूर्यवंशी आंदोलनात उपस्थित होत्या..*असे सौ.ज्योती पावरा*जिल्हाध्यक्ष:- राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी, धुळे),*सौ.सरोज कदम.*(*शहराध्यक्ष:- राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, धुळ.) यांनी कळविले आहे
