नानाश्री प्रतिष्ठान व मनोरम गृपच्या वतीने..मिस इंडीया डॅा.मोनिया केदारचा सत्कार..


 


नानाश्री प्रतिष्ठान व मनोरम गृपच्या वतीने..मिस इंडीया डॅा.मोनिया केदारचा सत्कार..

चोपडा -दि.१५(प्रतिनिधी) येथील द मिस इंडीया २०२१ च्या मानकरी डॅा.मोनिया केदार यांनी द इंटर नॅशनल गॅम्लर प्रोजेक्ट अवार्डचा मोलाचा मिस इंडिया २०२१ हा पुरस्कार आपल्या यथायोग्य परिश्रमातून प्राप्त केल्यानंतर त्यांचा सत्कार नानाश्री प्रतिष्ठान व मनोरम गृपच्या वतीने नुकताच करण्यात आला.डॅा.केदार यांचा सत्कार मनोरमच्या संचालिका तसेच तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या संचालिका रंजना श्रीकांत नेवे यांनी केला.यावेळी डॅा.केदार याचे वडील मुकुंद केदार,मातोश्री उषा बाविस्कर केदार,मनोरमचे संचालक सागर नेवे,सौरभ नेवे आदि उपस्थित होते.चोपड्या सारख्या अत्यंत ग्रामीण समजल्या जाणाऱ्या भागात मिळवून आणतांना आपले कौशल्यपणाला लावून डॅा.मोनिया यांनी मानाचा तुरा खोवल्याच्या विशेष कौतुक असल्याचे मनोगत सौरभ नेवे यांनी व्यक्त करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने