महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एक दिवसीय आंदोलन
धरणगाव दि.२७(प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रस्ते साधन सुविधा व अस्थापणा यांच्या अध्यक्षतेखाली धरणगाव येथे रमाई घरकुल योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळावा असे आश्वन देवून सुध्दा लाभ देण्यास टाळाटाळ करण्यात आले म्हणुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक दिवसीय आंदोलन करून संबंधित कामचुकार अधिकारी यांचा जाहीर निषेध करण्यात आला. दि.27/9/2021सोमवारी सकाळी 10:30 वाजता धरणगाव तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन व जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे धरणगाव तालुका संघटक संपर्कप्रमुख राजू बाविस्कर यांनी कळविले आहे.