सायकल विकत न घेणारा माणूस आज मेहनत व अखंड परिश्रम करून प्रामाणिकपणाच्या बळावर हेलिकॉप्टर विकत घेऊ शकतो- माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी..केशरानंद जिनिंग व ऑईल मिलच्या विविध कामांचे उदघाटन व कापूस खरेदीचा शुभारंभ ..



 सा

यकल विकत न घेणारा माणूस आज मेहनत व अखंड परिश्रम करून प्रामाणिकपणाच्या बळावर हेलिकॉप्टर विकत घेऊ शकतो- माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी..केशरानंद जिनिंग व ऑईल मिलच्या विविध कामांचे उदघाटन व कापूस खरेदीचा शुभारंभ ..

दोंडाईचा दि.१८ (प्रतिनिधी: रविभाऊ शिरसाठ )बाम्हणे शिवारातील केशरानंद उद्योग समुहाचे केशरानंद जिनिंग व ऑईल मिलच्या विविध कामांचे उदघाटन व कापूस खरेदीचा शुभारंभ काल संपन्न झाला. ज्यांनी 1980 साली सायकल दुकान टाकले व त्याकाळी ते सायकल सुद्धा नवीन घेऊ शकत नव्हते असे ज्ञानेश्वर भामरे हेलिकॉप्टर विकत घेऊ शकतात असे प्रतिपादन माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले..


आज अनंत चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर केशरानंद उद्योग समुहाचा कार्यक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांचा कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे या दृष्टीने कापूस शुभारंभ चा मुहूर्त होता. परंतु पितृपक्ष सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांनी कापुस विक्रीसाठी अजून पंधरा दिवस कापूस विक्रीसाठी आणू नये घटस्थापनेनंतर शेतकऱ्यांनी कापुस विक्रीसाठी आणावे. यावेळी स्टिमटेक कं. ड्रायरचे उदघाटन राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी केले, तर कापूस खरेदीचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे कार्यकारी संचालक अरुण उन्हाळे यांनी केले कापूस साठवनुक नवीन शेड जिनिंग काँक्रिटीकरणचे उद्घाटन तत्कालीन पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या हस्ते झाले. तसेच विविध नवीन कामांचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

  या कार्यक्रमाला काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शानाभाऊ सोनवणे माजी आमदार रामकृष्ण पाटील, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता पोपटराव सोनवणे, माजी नगराध्यक्ष नानाभाऊ मराठे, अॅड.एकनाथ भावसार, मयुर बोरसे, युवक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष कुणाल पवार, उपनगराध्यक्ष नबु पिंजारी, माजी पाणीपुरवठा समीतीचे सभापती प्रतिनिधी किसन दोधेजा, माजी नगराध्यक्ष रमेश कुकरेजा, नगरसेवक गिरधारीलाल रुपचंदाणी, गिरधारीलाल रामराख्या, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष चिराग माळी, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष गिरीश पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रावसाहेब पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष साहेबराव खरकार, दिपक गिरासे, ओबीसी सेलचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बापु महाजन, वसंत बापू कोळी आर एन पाटील, हेमराज पाटील, सत्यजित सिसोदे, राहुल माणिक, आदिवासी संघटनेचे भारत जाधव अंजनविहीरे भिल संघटनेचे अध्यक्ष भरत मोरे, शिवसेनेचे शैलेश सोनार, वसंत कोळी केशरानंद उद्योग समुहाचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे, माजी नगरसेवक रविराज भामरे, उद्योग समूहाचे एमडी शिवराज भामरे, केशरानंद हॉस्पिटलचे डाॅ.महेंद्र बोरसे यांच्यासह केशरानंद परिवाराचे सदस्य कार्यकर्ते आणि राज्यातील आलेले जिनिंग व्यवसायातील मान्यवर तसेच शेतकरी बांधव अनेक भगिनी युवक शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती बोलतांना म्हणाले की, श्री भामरे हे एकेकाळी त्यांच्या गावी सायकलचा पंचर काढण्याचे काम करत असायचे तसेच सायकल विकत न घेणारे ज्ञानेश्वर भामरे आज हेलिकॉप्टर विकत घेऊ शकतात. जवळपास शंभर एकर पेक्षा जास्त जमीनीवर केशरानंद उद्योग समुहाचा उद्योग उभा आहे. त्यात जिनिंग,ऑईलमिल, कापूस पासुन तयार होणारे सरकी ढेप असे अनेक प्रकारचे प्रकिया उद्योग सुरू आहेत. त्यातुन अनेक उद्योगाचे उदघाटन माझ्या हस्ते झाले आहे. माझे सहकारी ज्ञानेश्वर भामरे यांनी सायकल दुकानापासुन व्यवसायाची सुरुवात केली शून्यातून विश्व निर्माण केलं व्यवसायात मेहनत, जिद्द आणि चिकाटी, सातत्य ठेवल्याने आज उद्योगपती यांच्या यादी मध्ये नाव आहे. आज उद्योगपती म्हणून शिंदखेडा तालुक्यात परिचित झालेत असे अरूणभाई गुजराती यांनी उदगार काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकपर भाषणात सांगितले की, माझी सुरुवात सायकल दुकानापासून झाली हे खर आहे आणि माझ्या सगळ्या व्यवसायांचे नाव आई आणि वडील केशर आनंद यांच्या नावाने ठेवले असल्यामुळे मी कधीही माझ्या व्यवसायामध्ये चुकीचे काम केले नाही. पुढेही करणार  नाही पंधरा हजार रुपयाचा स्टेट बँकेचे पहिले कर्ज घेतल्यानंतर आजपर्यंत मी कधीही थकबाकीदार झालो नाही. अतीशय अत्यंत सचोटीने या ठिकाणी दोन जिनिंग एक ऑइल मिल खाजगी बाजार आणि आता सर्किस शिकवण्याचा ड्रायरचा प्रोजेक्ट अरुणभाई गुजराती यांच्या हस्ते सुरू झाला आहे 30 जुलै 2020 रोजी मला कोरणा-या आजाराने घेरले पूर्ण संपूर्ण कुटुंब मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलला आम्हाला पूर्ण कुटुंबाला ॲडमिट व्हावे लागले माझा स्कोर पंचवीस म्हणजे शंभर टक्के कोरोना मला झाला होता आणि मला मी आता वाचणार नाही असं वाटत असताना परमेश्वराने मला परत पाठवलेले आहे. आणि म्हणून त्याच्या पुढच्या काळात माझ्या सर्व जीवन यासमोर बसलेल्या जनतेसाठी समर्पित करायचं  आहे येणाऱ्या काळात मला या समोर बसलेल्या जनतेची सेवा करायची आहे. अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी याप्रसंगी केले. तर किरण शिंदे, शानाभाऊ सोनवणे, एकनाथ भावसार, राकेश पाटील, शामकांत सनेर, यांचीसुद्धा मनोगत कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यक्त करण्यात आली. व अरुणभाई गुजराती यांचे अध्यक्षीय भाषण झाले. तर माजी नगरसेवक रविराज भामरे यांनी आभार मानले...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने