*शेवाळे मंडळ अधिकाऱ्यांचा तुघलकी कारभार..कायदा धाब्यावर बसवत मनमानीचा प्रचंड कहर.. त्रासाने नागरीकांचे नाकीनऊ.. जिल्हाधिकारी साहेबांनो चिमठाण्यावरून नेमणुकीच्या ठिकाणी पाठवा वरझडीचे माजी सरपंच सतिष कोळींची मागणी*

 




*शेवाळे मंडळ अधिकाऱ्यांचा तुघलकी कारभार..कायदा धाब्यावर बसवत मनमानीचा प्रचंड कहर..  त्रासाने नागरीकांचे नाकीनऊ.. जिल्हाधिकारी साहेबांनो चिमठाण्यावरून नेमणुकीच्या ठिकाणी पाठवा वरझडीचे माजी सरपंच सतिष कोळींची मागणी* 

शिंदखेडा दि.२० (प्रतिनिधी रवि शिरसाठ) : शेवाळे मंडळ अधिकारी श्री.परमेश्वर कौतिक धनगर हे कायद्याचे नियम धाब्यावर बसवत नेमणूकिच्या ठिकाणी सेवा न बजावता आपल्याला सोईस्कर स्थळी ठाण मांडून  सेवा देण्यात माहिर झाले आहेत.लोकांना येण्या-जाण्याच्या त्रासाला पायी तुडवत हम करे सो कायदा.. याप्रमाणे वागत असल्याने त्रासाला कंटाळलेल्या गावकऱ्यांच्या डोक्यावरून पाणी गेल्याने संबंधित मंडळ अधिकाऱ्यांविरुद्ध  जिल्हाधिकाऱ्यांकडे उचल बांगडी करून त्यांचे कार्यालय चिमठाणे न ठेवता दोंडाईचा किंवा शेवाळे येथे ठेवावे व परिसरातील नागरिकांची कुचंबना थांबवावी अशी जोरदार मागणी वरझडीचे माजी सरपंच सतिष टेकचंद कोळी यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे. माझे कोणी काहीही करू शकत असे दरडावत अनेकांचा अपमान करण्याचा प्रसंग काहिंवर ओढवल्याने   त्यांच्याविरुद्ध तीव्र नाराजीचाचा सूर उमटत आहे.

 एखाद्या राजकीय नेत्याप्रमाणे यांच्यावर झालेल्या तक्रारी वर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही याचा फायदा उठवत शेवाळे मंडळ अधिकारी यांच्या मनमानी कारभार नेहमी प्रमाणे वाढतच चालला आहे त्यांची नियुक्ती ही शेवाळे येथे असुन ते दादागिरी ने चिमठाणे येथे बसणे शेतकऱ्यांना कायद्याचा दाख दाखवुन उडवा उडवी चे उत्तरे देणे नोंदी नामंजूर करणे गरीब आदिवासी कुटुंबातील श्रावणबाळ योजनेचे फॉर्म अपात्र करणे ड्युटी वर नेहमी उशीरा येणे कामचोर पणा करणे, रेशनकार्ड चौकशी मध्ये कुठलीही चौकशी न करता त्रुटी दाखवून अपात्र करणे म्हणुन या भ्रष्ट अधिकारी वर चौकशी करून निलंबनाची कार्यवाही झालीच पाहिजे तसेच त्यांचा मनमानी कारभार हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे म्हणून त्यांची चौकशी करून निलंबनाची कार्यवाही झालीच पाहिजे. अशी मागणीही कोळी यांनी केली आहे.

कायद्याचा नियमानुसार वारसाची नोंद ही पंधरा ते सोळा दिवसांत मंजुर करणे अनिवार्य आहे परंतु हे महाशय दोन ते तिन महीने ढुंकूनही बघत नाही आणि बघितले तरी काहीपण त्रुटी दाखवुन नामंजूर करतात.तसेच हे महाशय मुख्यलायाला हजर न राहता इतर ठिकाणी राहण्याचे प्रयोजन काय? असा सवाल क्रोधित गावकऱ्यांनी केला आहे.

तरी जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून या मंडळ अधिकारी यांना नेमणुकीच्या ठिकाणी सेवा बजावण्याचा आदेश द्यावा अशी जोरदार मागणी केली केली आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने