देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसानिमित्तन नवभारत महोत्सवाचे उद्घाटन.. लोक कल्याणकारी व जनहिताच्या योजना युवा मोर्चाच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणार---माजी जलसंपदामंत्री आदरणीय आमदार गिरीश भाऊ महाजन..!
जामनेर दि.१८ (प्रतिनिधी) : गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली तसेच भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून भारताचे सक्षम नेतृत्व पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण अभियान अंतर्गत *नवभारत महोत्सवाच्या* माध्यमातून *"नमो रथाचे"* (digital exhibition van) चे उद्घाटन आदरणीय श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना गिरीश भाऊ मी सांगितले की लोक कल्याणकारी राज्य आणण्याकरता लोककल्याणकारी योजना ह्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनहित संकल्पनेतून यशस्वी होताना दिसत आहे म्हणून "नमो रथाच्या"माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत हा रथ पोहोचून सामान्य जनतेला योजनांची माहिती ही मिळणार आहे. यावेळी रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी ही या रथाच्या उद्घाटनाप्रसंगी अनमोल असे मार्गदर्शन उपस्थितांना केले यावेळी संतोष सराफ यांनी गायलेल्या पोवाड्याच्या माध्यमातूनआदरणीय पंतप्रधानांच्या विविध कल्याणकारी योजना या लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या!
यावेळी जामनेर नगर परिषदेच्या प्रथम महिला नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन,भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव तथा नवभरात महोत्सवाच्या संयोजक सौ भैरवी ताई वाघ पलांडे या उपस्थित होत्या तसेचभारतीय जनता पार्टीचे जामनेर तालुका अध्यक्ष श्री चंद्रकांत बाविस्कर भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री श्रीकांत जी पाटील तसेच भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष श्री आतिश झाल्टे,भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस रवींद्र झाल्टे, उपनगराध्यक्ष श्री शरद पाटील, नगरसेवक अनिस शेख, नगरसेवक शोएब, माजी नगरसेवक दीपक तायडे, नगरसेवक श्रीराम नाना, ज्येष्ठ नेते छगन झाल्टे, जिल्हा संयोजक नवल पाटील,भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री निलेश चव्हाण,डॉक्टर संजीव पाटील, सुहास पाटील, दत्तात्रय सोनवणे, रमेश नाईक,तालुका सरचिटणीस श्री मयुर पाटील,सुभाष पवार, विजय शिरसाट, विकास वंजारी, वैभव नाईक, विश्वनाथ चव्हाण शुभम माळी, संजय सूर्यवंशी सर ,मनोज जंजाळ, विलास हिवराळे, जालम सिंग राजपूत, आकाश नेमाडे तसेच पथनाट्य प्रमुख संतोष सराफ सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..