*खैरगांव (का.) येथे माती परीक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला*




 *खैरगांव (का.) येथे माती परीक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला* 

सावरखेडा दि.०१(प्रतिनिधी चेतन दुर्गे ):खैरगांव (का.) येथे माती परीक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत खैरगाव (का) येथे मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ गव वतीने माती परीक्षण उपक्रम राबविण्यात आला. या महाविद्यालयाचे विद्यार्थिनी कु. स्नेहल प्रफुल ढाले यांनी मातीचे परीक्षण करून शेतकऱ्यांना उपयोगी मार्गदर्शन केले. प्रयोगशील शेतकरी अनंतराव वाघमारे यांच्या शेतात हा उपक्रम राबविण्यात आला. शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पादनात भर पडण्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे असल्याचे सांगून इतरही महत्व पटवून सांगण्यात आले. त्यातून जमिनीला पोषक तत्व, सुष्म, अन्नद्रव्य याचा वेध घेत येतो व पैश्याची बचत होते, या उत्पादनात वाढ होते. कार्यक्रमाला उपस्थित रमेश ढाले, गजानन ढाले, प्रफुल ढाले, किशोर ढाले, इ. या उपक्रमासाठी विद्यार्थी, प्राचार्य डॉ. आर ठाकरे उप, कडू सर कार्यक्रम अधिकारी शुभम सरप, विषय तज्ञ प्रणिता चवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने