*कृषिमंत्री दादा भुसे यांचा जामनेर तालुका दौऱ्यात शिवसेनेत नाराजी नाट्य.. स्थानिक पदाधिकाऱ्यांचा दौऱ्यातुन काढता पाय शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ मनोहर पाटील यांची प्रतिक्रिया.*
जामनेर दि.१२ (प्रतिनिधी) तालुक्यात पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री ना गुलाबराव पाटील यांनी दिनांक १०-०९-२०२१ रोजी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत असताना सर्व पक्षीय पदाधिकारी यांना सोबत घेऊन थेट शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करून शेतकरी यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या.
दिनांक ११-०९-२०२१ रोजी जामनेर तालुक्यात शिवसेनेत वेगळे चित्र दिसून आले. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे हे जामनेर तालुक्यात अतिवृष्टी व चक्रीवादळ झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आले त्यांनी जामनेर तालुक्यातील शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी यांना सोबत न घेता पाहणी करण्यासाठी गेले परंतु तालुक्यात संकट आल्या दिवसापासुन स्थानिक शिवसैनिक शेतकऱ्यांसोबत उभा आहे, नुकसानग्रस्त भागाच्या पहाणी उद्धवसाहेबांचे डोळे बनुन तालुक्यातील शिवसैनिकांनी केली त्यामुळे नुकसानग्रस्त भागाची संपूर्ण माहीती शिवसैनिक जाणुन आहेत असं असुनही जामनेर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याने दौर्यातुन बाहेर पडलो असल्याची प्रतिक्रिया जळगाव जिल्हा उपजिल्हाप्रमुख डॉ.मनोहर पाटील यांनी दिली आहे.