*शिंदखेडा शहरात जिथे समस्या तिथे काँग्रेस गटनेते दिपक देसले सह नगरसेवकाची मोहीम.. रज्जाक नगर व नदीपार भिलाटी विकास कामांचा लाभापासून वंचित कारवाईची मागणी*
शिंदखेडा दि.११ (तालुका प्रतिनिधी यादवराव सावंत ) *शिंदखेडा शहरातील वार्डनिहाय समस्या*- शहरात चाललेल्या गैर कारभाराविषयी काँग्रेस चे प्र नगराध्यक्ष तथा गटनेते दिपक दादा देसले यांच्या नेतृत्वाखाली जिथे समस्या तिथे काँग्रेस वार्डनिहाय मोहीम सुरू केली आहे. चौथी समस्या *वार्ड क्र.5* मधील रज्जाक नगर नदीपार भिलाटी येथे आदिवासीं जमाजातील महिला नगरसेविका संगीता चंद्रकांत सोनवणे निवडून आल्यानंतर गेल्या साडेतीन वर्षांत एकही विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही.हया आदिवासीं भिल समाज महिला नगरसेविका असल्याने जाणुन बुजून सत्ताधारी पक्षातील सर्वमान्य नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी एकही विकासात्मक कामात निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. म्हणुन आपल्या सत्पप्त भावना व्यक्त केल्या आहेत.हयाप्रसगी नगरसेविका संगीता चंद्रकांत सोनवणे ,गटनेते दिपक देसले , विरोधी पक्षनेते सुनील चौधरी , नगरसेवक दिपक अहिरे , उदय देसले स्विकृत नगरसेवक सुमित जैन चंद्रकांत सोनवणे ,किरण थोरात सह दगा माळी , सिंधुबाई भिल , हजर होते एकही विकास झाले नाही म्हणुन रहिवाशांनी संतप्त प्रतिक्रिया मांडल्या असुन ह्यावर चौकशी होऊन कायदेशीर अनुसूचित जनजाती प्रमाणे नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी.संबधित वार्डातील प्रश्न न सोडविण्यास जिल्हाधिकारी कडे पाढा वाचून निदर्शनास आणून काॅग्रेस व शहरवासियांतर्फ पुढील काळात तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे काँग्रेस चे गटनेते दिपक देसले यांच्यासह नगरसेवकानी केली आहे.