*धुळे येथे कोळी समाजाची बैठक संपन्न*
धुळे दि.११(प्रतिनिधी):-कोविड- १९ या जागतिक वैश्विक महामारीमुळे भारत देशासह संपूर्ण जगात हाहाकार माजला होता,या महामारीने गेल्या एक दिड वर्षात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले,अनेक प्रियजन, निकटवर्तीय आपल्या पासून निसर्गाने हिरावून नेले.
धुळे येथील कोळी समाजाचे जेष्ठ व निष्ठावान कार्यकर्ते मा.श्री.आप्पासाहेब गिरधरजी दाजमल महाले,मा.श्री.बापूसाहेब दिलीपजी बागूल (भिलाली),मा.श्री.दादासाहेब देविदासजी नवसारे ,मा.श्री.एस.कुमार पेंटर(बेटावद),(जगनबापू पेंटर),मा.श्री.दादासाहेब गुलाबरावजी बोरसे यांनी जळगाव,धुळे व नंदुरबार जिल्ह्य़ातील (खांदेश विभागीय) कोळी समाज बांधवांची बैठकीचे आयोजन दिनांक ०५ सप्टेंबर २०२१ रोजी केले होते.
या बैठकीस जळगाव येथील कोळी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते मा.श्री.अनिलदादा देविदास नंन्नवरे,बांभोरीकर यांना प्रमुख मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी मान्यवरांचे हस्ते कोळी समाजाचे आराध्य दैवत महर्षीं वाल्मिकी यांचे प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले.
आपण समाजात वावरतो, आपल्या कडून समाजाचे देणे लागते या ऋणानुबंधातून खांदेश विभागाचे कोळी समाजाचे कार्यकर्ते जळगाव येथील प्रमुख सत्कारमूर्ती मा.श्री.अनिलदादा देविदास नंन्नवरे यांचे कार्य हे कौतुकास्पद आहे आपल्या जळगाव जिल्ह्य़ात तर त्यांचे कार्य आहेच त्या शिवाय धुळे व नंदुरबार जिल्ह्य़ात त्यांचे विशेष योगदान आहे,मौजे वाघाडी, ता.शिरपूर येथील स्मीथ केमीसिंथ केमिकल फॅक्टरीत गेल्या वर्षी स्फोट होऊन स्व.आनंद कोळी व स्व.नितिन कोळी या समाजाचे दोन कर्त्या युवकांना आपला जीव गमवावा लागला होता,त्यांच्या कुटंबियांना फुल नाही पण फुलाची पाकळी म्हणून अनिलदादांनी वैयक्तिक आर्थिक मदत केली होती.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी दर वर्षी खांदेशातील दोन हजार पाचशे विद्यार्थ्यांना ते शालेय साहित्य वाटप करतात,शिरपूर येथील आश्रम शाळेत त्यांनी कार्यक्रम आयोजित करून तेथील विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप केले आहे.
८ मे या जागतिक महीला दिनानिमित्त मौजे वर्षी ता.शिंदखेडा, जि.धुळे येथील समाजाची गरीब विधवा उषाताई कोळी यांचे पती दारूच्या अतिसेवनाने मयत झालेले आहेत त्यांना लहान मुले आहेत, मोलमजुरी करून उदरनिर्वाह केल्या शिवाय त्यांना पर्याय नव्हता अश्या असाह्य भगीनीला अनिलदादा नी झिंगे,बोंबील,मासे चे छोटे दुकान टाकून देऊन घरात किराणा करून दिला आहे.
अनिलदादा नंन्नवरे प्रत्येक वर्षी समाजाचे गरीब घरातील चार मुले दत्तक घेतात व त्यांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च ते करत असतात २०१० पासून त्यांनी ही योजना चालू केली असून त्यांनी दत्तक घेतलेले विद्यार्थ्यी आज मोठ मोठ्या हुद्द्यावर आहेत पोलीस उपनिरीक्षक, इंजिनिअर, वकील, एम.बी.ए.झालेले आहेत, सामूहिक वधूवर पालक परिचय मेळावा असो की सामूहिक विवाह सोहळा असो अनिल दादांचे योगदान हे असतेच.
कोवीड-१९ च्या काळात त्यांनी कोरोणा ची लागण झालेल्या रूग्नांना आपला स्वतःच्या वाहनातून रूग्नालयात उपचारासाठी दाखल केले व बरे झालेल्या रूग्नांना घरी पोहचवले,जळगाव येथील शासकीय रुग्णालयात तथा वैद्यकीय महाविद्यालय येथील रूग्न तसेच त्यांचे सोबतचे नातेवाईकांना आठ दिवस खिचडी देण्यात आली तसेच रेल्वे स्टेशन परिसर,बस स्थानक परिसरात व रस्त्यावर फूटपाथवर वास्तव्यास असलेल्या लोकांना अन्नदान करण्यात आले कर्तव्यावर असलेले साफसफाई कर्मचारीवर्ग, रूग्नालयातील कर्मचारीवर्ग, पोलीस कर्मचारीवर्ग यांना कोरोणा काळात एक हजार मास्क, सॅनीटायझर तसेच एक हजार ग्लुकोज बिस्किट व पाचशेहून जास्त मिनिरल वाॅटर बाॅटल देण्यात आल्या.
आपल्या वाढदिवसावर होणारा खर्च न करता कोरोणा होऊन मयत झालेल्या एका परिवाराला एक्कावन्न हजार रूपयांची वैयक्तिक मदत अनिलदादा यांनी केली त्यांच्या कार्याची दखल घेऊन जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार मा.ना.श्री.उन्मेष दादा पाटील साहेब यांनी "कोरोणा योद्धा" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मा.श्री.अनिलदादा नंन्नवरे हे अखिल भारतीय कोळी समाज नवी दिल्ली (रजि.) शाखा महाराष्ट्र प्रदेश चे गेल्या सोळा वर्षांपासून निष्ठेने काम काज करत आहेत,त्यांच्या नेतृत्वाखालील व मार्गदर्शनाखाली समाजाचे व सामाजिक मोठ मोठे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडलेली आहेत,नेहमी समाज बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध राहतात मग त्या कुठल्याही स्वरूपाच्या असोत,मदती साठी आलेली व्यक्ती मदती वीना परत आज पर्यंत रिकाम्या हाताने गेलेली आठवत नाही आपल्या नावाचा मोठा वाजा गाजा न करता अनेक वेळा गुप्त प्रकारची मदत ते करत असतात.
धुळे व नंदुरबार जिल्ह्य़ातील कोळी समाज बांधवांनी त्यांचा सामूहिक सत्कार केला यावेळी अखिल भारतीय कोळी समाज नवि दिल्ली (रजि.)शाखा महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा बांभोरी गृप ग्रामपंचायत चे उपसरपंच व स्वराज्य पॅनलचे प्रमुख मा.श्री.भिकनदादा शामराव नंन्नवरे तसेच जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष मा.श्री.धनराजभाऊ विठ्ठल साळूंके,मा.श्री.गणेश भाऊ कोळी यांचा शाल,श्रीफल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सदर बैठकीत कोळी समाजाच्या समस्या व प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली,जातीचे प्रमाणपत्र सुलभ व जाचक अटी न लादता देण्यात यावे,अधिसंख्ये पदांबाबतीत निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नांसंदर्भात विचार विनिमय करण्यात आला तसेच जातपडताळणी प्रमाण पञ विना अटी व शर्तीने देण्यात यावे याबाबत शासन स्तरावर लढा देण्या संदर्भात चर्चा करण्यात आली.
धुळे येथील कोळी समाजाचे जेष्ठ व निष्ठावान कार्यकर्ते मा.श्री.आप्पासाहेब गिरधरजी दाजमल महाले,मा.श्री.बापूसाहेब दिलीपजी बागूल (भिलाली),मा.श्री.दादासाहेब देविदासजी नवसारे ,मा.श्री.एस.कुमार पेंटर(बेटावद),(जगनबापू पेंटर),मा.श्री.दादासाहेब गुलाबरावजी बोरसे यांनी आपल्या कोळी समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल व योगदानाबद्दल श्री.महेशभाऊ पांडूरंग शिरसाठ( झटपट पोलखोल न्यूज चॅनलचे मुख्य संपादक ) ,मा.श्री.कैलासजी कोळी,धुळे,मा.श्री.अरूण भाऊसाहेब वाघ, धुळे,मा.श्री.वसंतजी जाधव, धुळे, मा.श्री.देवेंद्र जी नवसारे, खेडा,मा.श्री.छोटूदादा बागूल, नेवाडे,मा.श्री.सुकलालजी दगा बोरसे, मा.श्री.रामचंद्र जी सोनवणे,मा.श्री.संदिपभाऊ सोनवणे,मा.श्री.नारायण जी बागुल, खेतिया, मा.श्री.गुलाबराव जी बोरसे,धुळे,मा.श्री.अशोक ईशी सर,मा.श्री.गोविंदराव शिरसाठ, मा.श्री.सुकलाल बापू शिरसाठ, नंदुरबार,मा.श्री.देविदास रामदास कोळी(देवाबापू कोळी),शिंदखेडा,मा.श्री.आबासाहेब देविदास श्रीराव, तोंदे,मा.श्री.राहूल भाऊ श्रीराम ईशी,असली,मा.श्री.विनायकराव एकनाथ बाविस्कर, शिरपूर ,मा.श्री.हिरालालभाऊ वाकडे,शिरपूर, मा.श्री.बापूसाहेब कोळी,शहादा,मा.श्री.विनायक जी कोळी, धुळे,मा.श्री.संजयजी दिलीप शिंदे,मा.श्री.पंकज जी चव्हाण,देगाव,मा.श्री.मुकेश भाऊ चव्हाण,शिंदखेडा,मा.श्री.अशोकराव कुवर,सातारे,मा.श्री.आकाश भाऊ कोळी,दोंडाईचा,मा.श्री.रावसाहेब सैंदाणे, अक्कडसे, मा.श्री.नितिनभाऊ अखडमल, लोंढरे,मा.श्री.किशोरजी शिरसाठ, टेकवाडे,मा.श्री.भरतजी वाघ, वार,मा.श्री.योगेशजी सावळे,मा.श्री.जयपालजी अखडमल,
आदी समाज बांधवांचा शाल,श्रीफल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
धुळे जिल्ह्यातील उभरती तोफ व मा.श्री.आप्पासाहेब गिरधरजी महाले यांचे चिरंजीव अर्जुन महाले यांची भारतीय जनता युवा मोर्चा च्या धुळे शहर युवक उपाध्यक्ष निवड झाल्याबद्दल जळगाव जिल्ह्याच्या वतीने मा.श्री.अनिलदादा नंन्नवरे यांच्या हस्ते शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.ना.बापूसाहेब कोळी,शहादा यांनी केले तर आभार प्रदर्शन मा.श्री.देवाबापू कोळी,शिंदखेडा यांनी केले.
कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सर्व समाज बांधवांना सुरूची जेवनाची व्यवस्था कार्यक्रमाचे आयोजक मा.श्री.आप्पासाहेब गिरधरजी दाजमल महाले,मा.श्री.बापूसाहेब दिलीपजी बागूल (भिलाली),मा.श्री.दादासाहेब देविदासजी नवसारे ,मा.श्री.एस.कुमार पेंटर(बेटावद),(जगनबापू पेंटर),मा.श्री.दादासाहेब गुलाबरावजी बोरसे केली होती.