जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे
20 सप्टेंबर रोजी ऑनलाईन आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) दि. 15 - समस्याग्रस्त व पीडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. यादृष्टीने महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो.
त्यानुषंगाने या महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार, 20 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 11.00 वा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन आयोजीत करण्यात आलेला आहे. या लोकशाही दिनी ज्या महिलांना आपली तक्रार मांडावयाची असेल त्यांनी आपला तक्रार अर्ज आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या मेलवर पाठवावा. तसेच अर्जामध्ये आपला व्हॅटसअप नंबर नमुद करावा, जेणेकरुन या लोकशाही दिनाची लिंक व पासवर्ड अर्जदारास उपलब्ध करुन दिला जाईल. असे विजयसिंग परदेशी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव- dwcwjal@gmail.com, तहसिलदार, जळगाव- tahasildarjalgaon@