झटपट पोलखोल वृत्ताची दखल सहा तासातच बसवला इलेक्ट्रिक पोल ..एम एस ई बी ने केले "चट मंगणी पट विवाह"काम..उप* *अभियंता प्रतिक टेकाऴे यांचेसह विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारींचे गावकऱ्यांनी मानले आभार..*

 



*झटपट पोलखोल वृत्ताची दखल  सहा तासातच बसवला इलेक्ट्रिक पोल ..एम एस ई बी ने  केले "चट मंगणी पट विवाह"काम..उप* *अभियंता प्रतिक टेकाऴे यांचेसह विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारींचे गावकऱ्यांनी मानले आभार..* 

चौगाव ,ता.चोपडा दि.०२(प्रतिनीधी)

चौगाव ता.चोपडा येथील शेतकरी शेतात लोंबकळत असणाऱ्या विज वाहक तारा उंच करण्या बाबत गेल्या चार महीण्यापासून लासूर विज वितरण कंपनीचे उप अभियंता प्रतिक टेकाळे,स्थानिक वायरमन व लाईनमन यांना पाठपुरावा करत होते.मात्र उद्या करू, परवा करू याच्या पलिकडे विषयच जात नव्हता.म्हणून पुढचा पर्याय म्हणून शेतकरी विश्राम धनगर,रविंद्र पाटिल व विमलबाई पाटील यांनी आपले गार्हाणे झटपट पोलखोल न्यूज चॅनलकडे मांडले असता  वृत प्रसारित करताच लासुर विजवितरण कंपनी उप केंद्राचे उप अभियंता प्रतिक टेकाऴे यांनी मनांवर घेऊन  "चट मंगणी पट विवाह"याप्रमाणे त्वरीत अॕक्शन घेऊन काम मार्गी लावले म्हणून संबंधित टेकाळे साहेब त्यांच्या कर्मचारींचे गावकऱ्यांनी कौतुक केले जात आहे.     अवघ्या सहा तासातच त्या ठिकाणी पोल टाकून विज वितरण कंपनीने विज वाहक तारा उंच केल्या व येथील संभाव्य धोका टळल्यामुळे. तेथील शेतकर्यांनी प्रसार माध्यमांचे व लासुर विजवितरण कंपनी उप केंद्राचे उप अभियंता प्रतिक टेकाऴे यांचे आभार मानले.लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे प्रसार माध्यम एकजूटीने सर्वसामान्य व्यक्तींना कसा न्याय मिळवून देऊ शकतात याचे हे उत्तम उदाहरण असल्याची प्रतिक्रीया पत्रकार विश्राम तेले यांनी यावेळी व्यक्त केली . एकाच दिवसात विज इलेक्ट्रिक पोल बसवून तारा टाकण्याचे काम झटपट केल्यामुळे जनतेचा प्रश्न मिटल्याने टेकाळे साहेब यांचे झटपट पोलखोल अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने