*असली गावात प्रथम लस घेतली उपसरपंच हिराबाई भिका कोळी यांनी .. लसीकरण मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद*
असली,ता.शिरपुर दि.३१(प्रतिनिधी राहुल ईशी): आज रोजी असली ग्राम पंचायतीच्या माध्यमातून जि.प.शाळा असली येथे कोरोना लसीकरण मोहीमेला सुरूवात केली.अगोदर उपसरपंच हिराबाई भिका कोळी यांनी लस घेतली नंतर सर्व गावकरी यांनी लसीकरण मोहीमेला प्रतिसाद दिला.यासाठी सरपंच सरलाबाई धनगर सामाजिक कार्यकर्ते राहुल ईशी लोटण कोळी सुनील पांडुरंग धनगरकोळी किरण कोळी अतुल धनगर समाधान बाविस्कर तसेच आशा वर्कर ताराबाई कोळी ग्रामसेविका गितांजली पाटील यांनी परिश्रम घेतले तसेच ता. आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र बागूल व डॉ मनोज पाटील वैद्यकीय अधिकारी खर्दे बु. मयुर फुलपगारे के बी फुलपागरे आरोग्य सहाय्यक श्रीमती आर एस ठाकरे.कोमल ठाकुर आरोग्य सहाय्यक यांनी परिश्रम घेतले