सरकारसाहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त फळझाडे वाटप*



 *सरकारसाहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त फळझाडे वाटप*

 

दोंडाईचा दि.०५,,(प्रतिनिधी संजय कोळी :)दोंडाईचा (एस.के) दि.२/८/२०२१ दोंडाईचा शहरातील उद्योगपती विकासरत्न सरकारसाहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध फळझाडे वाटपाचा कार्यक्रम रोटरी सिनियर्सच्या माध्यमातून पार पडला .कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी स्वो.वि.संस्थेंचे सचिव सि..एन.भाऊसाहेब प्रमुख पाहुणे पदी जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष डॉ एस.पी.गिरासे ,सचिव सुरेश बोरसे ,व्हि.एम.पाटील ,रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष राजेश माखीजा इ.मान्यवर उपस्थित होते.

          कार्यक्रमात उपस्थितांना मान्यवरांच्या हस्ते सिताफळ ,जामुन ,पेरु ,चिंच ,बोर इ.फळझाडे वाटप करण्यात आले.डाँ एस.पी.गिरासे यांनी सांगितले की आदरणीय सरकारसाहेब यांनी दरवर्षी वाढदिवसानिमित्त फळझाडे वाटप करुन निसर्गाचा समतोल राखत नागरिकांना देखील फळांचा आस्वाद घेता येईल असा मानस राखुन दरवर्षी हजारो फळझाडे वाटप करुन मोठे कार्य केल्याचे सांगितले.

   दोंडाईचा शहरातील नागरीकांनी दुपारी ३ ते ५ या वेळात प्रविण आय क्लिनिक ,रोटरी मार्ग दोंडाईचा येथुन प्रत्येकी एक फळझाडे घेऊन जावीत असे आवाहन रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष राजेश माखीजा सचिव अँड नितीन अयाचीत ,प्रो चेअरमन प्रविण महाजन ,चेतन सिसोदीया इ.सदस्यांनी केले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने