*महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ च्या वतीने सुरक्षारक्षक मंडळाला आंदोलनाचा दिला ईशारा*
धुळे दि.०५(प्रतिनिधी)
जिल्हा सुरक्षारक्षक मंडळात (जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हा) अंतर्गत गेल्या 4 ते 5 वर्षांपासून सुरक्षारक्षक यांना ड्रेस व किट, रेनकोट,घंमबुट व हिवाळी स्वेटर व सुरक्षा रक्षकांना ओळख पत्र अजुन मिळाले नाही येत्या 8 दिवसात मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर म्हणून सुरक्षारक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ च्या वतीने ऑड मा. विशालजी मोहिते (कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक मंडळ सल्लागार समिती सदस्य) यांच्या उपस्थितीत भव्य आंदोलन करण्यात येणार आहे. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
. साहाय्यक कामगार आयुक्त च. ना. बिरार याच्या अनुपस्थितीत आज महाराष्ट्र सुरक्षारक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ च्या वतीने उत्तर *महाराष्ट्र प्रमुख मिलिंद वाणी व धोंडीराम पगारे सचिव उत्तर महाराष्ट्र* यांनी आज धुळे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाचे वरीष्ठ लिपिक ए टी चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष च. ना. बिरार यांना संबधीत कामा निमित्त दूरध्वनीवरून संपर्क केला असता (गेल्या अनेक महिन्यांपासून) परंतु अध्यक्ष साहेब आमचा फोन उचलत नाही कोणतेही उत्तर दिले जात नाही. सामान्य सुरक्षारक्षक याचे कोणतेच प्रश्न सोडवले जात नाही. असा आरोप हे महाराष्ट्र सुरक्षारक्षक महासंघ चे उत्तर महाराष्ट्र प्रमुख मिलिंद वाणी यांनी केला आहे.