सरकारी जागेवर राहणाऱ्या लाभार्थी कुटुंबाच्या घराचे सर्वेक्षण 15 आँगस्ट पर्यत पूर्ण करणार.
राळेगाव*दि.०३(जिल्हा प्रतिनिधी शेख राजिक ): नगर पंचायत राळेगांव मार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधान मंत्री आवास योजनेच्या डि.पी आर 2 मधील 580 लाभार्थी कुटुंबे .सर्व साधारणपणे सरकारी जागेवर राहणारे घरकुल लाभार्थी कुटुंबाच्या घराचे रखडलेले सर्वेक्षण सर्व तांत्रिक बाबी तपासुन 15 आँगस्ट पर्यत पूर्ण करणार असल्याचे आश्वासन काकडे तालुका उप अधीक्षक भूमी अभिलेख राळेगाव यांनी शिवसेना गट प्रमुख शंकर गायधने यांचे पुढाकारात लाभार्थी कुटुंब प्रमुख व शिवसेना पदाधिकारी यांच्या भेटी प्रसंगी दिले.दीड वर्ष भरा पूर्वी खां.भावना गवळी यांचे कडुन अधिकाऱ्यांना निर्दैशा नंतर प्रधान मंत्री आवास योजने च्या सरकारी जागेवर अतीक्रमण करून राहणाऱ्या लाभार्थी कुटुंबाच्या घराचे सर्वेक्षणाचे काम सुरु होऊन नगर पंचायत व उप अधिक्षक भूमी अभिलेख कडुन जवळपास 120 लाभार्थी कुटुंबाच्या घराचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे त्यांना अजुन पर्यंत नगर पंचायत कडुन सीटी सर्वेक्षण प्रमाण पत्र देण्यात आलेली नाही शहरात घरकुलाचे नियमात बांधकाम करणाऱ्या लाभार्थी .कुटुंबाना तीन वर्षा पासुन केंद्र शासना कडुन तिसरा हप्ता मिळाला नसल्यामुळे ते कुटुंबे डबघाईस आली असल्याचे व संपूर्ण प्रधान मत्री आवास योजना रखडल्याची तक्रार शिवसेने कडुन जिल्हाधिकारी यांचे कडे करण्यात आली आहे . शिवसेने चे गट प्रमुख शंकर गायधने यांचे पुढाकारात शिवसेने च्या शिष्ट मंडळाने घरकुल लाभार्थी कुटुंब प्रमुखासह तालुकाउप अधिक्षकांचे भेटी प्रसंगी वरील आश्वासन दिले. तर 15 आँगस्ट पर्यत नगर पंचायत च्या डि. पी . आर 2 सरकारी जागेवर अतिक्रमन करुन राहणाऱ्या कुटुंबाचे सर्वेक्षणाचे व घराच्या मालकी चे पट्टे देण्याचे काम नगर पंचायत कडुन सुरू न झाल्यास शिवसेने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे शिष्ट मंडळात शिवसेना पदाधिकारी योगेश मलोंडे लता भोयर प्रभाकर धोटे भानुदास महाजन सुरेश चाफेकर संतोष मरसकोल्हे दादाराव राउत ई.नागरीक सहभागी होते.