*चोपड्यात कोरोना डोके वर काढू पाहतोय..आज आढळले २ पाॅझिटीव्ह .. अजूनही रानं मोकळे नाही..जरा जपून बरं..नियमात राहा लक्ष्मण रेषा ओलांडू नका ...हा एकच पर्याय..!*
चोपडा दि.२८(प्रतिनिधी)चोपडा तालुक्यातील
आज 2 रुग्ण आढळले आहेत पुन्हा कोरोना डोके वर काढू पाहत आहे. तरी जनतेने खबरदारी घेण्यात रस घ्यावा अन्यथा मागील दिवस परत येण्याची वाट आता तरी पाहू नये.जिल्हा पातळीवरील नियम पाळा व कोरोना टाळा एवढे च ध्यानी चर्या अशीच चर्चा सर्वत्र होत आहे
"आपण लस घेऊया... कोरोनाला हरवू या..!" , "कोरोना लाट थोपविण्यासाठी भर खबरदारी, लसीकरण करून घेणे हीच आता सर्वांची जबाबदारी !"
चोपडेकर आता तरी सावधगिरी बाळगा ; मास वापरा ; नेहमी हाथ धुत राहा ; सुरक्षित अंतर बाळगा
दि. 28 / 7 / 2021 रोजीचे अहवाल
चोपडा आज RTPCR Swab टेस्ट 17 अहवाल पैकी 00 अहवाल पॉजिटिव आहेत तर 17 अहवाल निगेटिव आहेत .
तसेच रैपिड टेस्ट चोपडा तालुका 02 अहवाल पॉझिटिव्ह आहेत .
एकूण 200 रैपिड अहवाल पैकी 02 अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 198 अहवाल निगेटीव्ह आहेत
*असे एकूण आज 00 + 02 = 02 अहवाल पॉजिटिव आहेत*
एकूण रुग्ण संख्या – 14511
बरे झालेले रुग्ण संख्या – 14296
मृत्यु रुग्ण संख्या – 211
असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे.....