पंतप्रधान आवास योजना लाभार्थीना मुदतवाढ द्या ..... नगरसेविका सौ. संध्या महाजन यांचे पालकमंत्री यांना निवेदन*

 



* *पंतप्रधान आवास योजना लाभार्थीना मुदतवाढ द्या ..... नगरसेविका सौ. संध्या महाजन यांचे पालकमंत्री यांना निवेदन*

चोपडा दि०१.(प्रतिनिधी)            
        दि. ३० जुलै रोजी पालक मंत्री ना. श्री. गुलाबराजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत बैठकीत शिवसेना नगरसेविका सौ. संध्या महाजन यांनी पंतप्रधान आवास योजना बाबत लाभार्थ्यांना काम सुरू करण्याबाबत मुदत वाढ देण्यात यावे याबाबत लाभार्थ्यांच्या वतीने निवेदन सादर केले.
विभागीय आयुक्तांच्या पत्रांनुसार नगरपालिकांना कामे सुरुवात न झालेल्या लाभार्थ्यांना १५ दिवसांची नोटीस देऊन इच्छुक नसलेल्या लाभार्थ्यांची नावे ३० जुलै पर्यंत वगळण्याची कार्यवाही करण्याबाबत आदेश आहेत. चोपडा नगरपरिषदे तर्फे पंतप्रधान आवास योजना घटक क्र. ४ वयक्तिक घरकुलास अनुदान अंतर्गत  २०० व  १३५ लाभार्थी असे २ DPRमंजुर आहेत. सदर घटकांतर्गत लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी बांधकाम परवानगी, त्याकामी कागदपत्रांची पूर्तता, पत व्यवस्था अशा काही बाबींची तजवीज करावी लागते. परंतु मागील दिड वर्षापासुन कोरोना विषाणू प्रार्दुभावमुळे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच वाळू उत्खननावर बंदी असल्याने वैयक्तिक घरकुलांचे बांधकाम करण्यास लाभार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहे. अशा काही अडचणी असलेल्या लाभार्थीची घरकुले बांधकामास सुरुवात झालेली नाही.
परंतु वरील नमुद अडचणींमुळे नागरिक इच्छुक असुनही त्यांची नावे वगळण्याची वेळ आलेली आहे. यादीत समाविष्ट लाभार्थीना योजनेचा लाभ व्हावा. त्यामुळे कागदपत्रांची वा इतर अडचण असलेल्या परंतु
बांधकामास इच्छूक लाभार्थ्यांना अधिक वेळ मिळावा, त्यांची नावे वगळण्याची मुदत ३० जुलै वरुन वाढविण्यात यावी, तसेच ज्या लाभार्थ्यांची कामे सुरु आहेत. परंतु अनुदानाचे हप्ते पुर्ण मिळाले नाहीत, अशा लाभार्थ्यांना पुढील हप्ते वितरीत करण्यासाठी
नगरपरिषदेस राज्य तसेच केंद्र शासनाचा उर्वरित निधी मिळावा. तसेच शहरातील मंजुर लाभार्थ्यांना देखिल वाळू उत्खननाबाबत सवलत मिळावी.
अतिक्रमित जागांवर रहाणारे लाभार्थी व भाडेकरु म्हणून रहाणारे / बेघर नागरिक यांनी देखिल नगरपरिषदेस सन २०१७ पासुन अर्ज केलेले आहेत. त्याकामी नगरपरिषदांकडून माहिती मागविणे व DPR सादर करण्याकामी उचित त्या कार्यवाहीचे यास्तव सदरच्या समस्या मांडणारे  निवेदन लाभार्थ्यांच्या वतीने सौ. संध्या महाजन यांच्याकडून मा. पालकमंत्री याना देण्यात आले. निवेदनास शिवसेना गटनेता श्री.महेंद्र धनगर, नगरसेवक श्री. महेश पवार,  श्री. राजाराम पाटील, श्री. रविंद्र पाटील, सौ.लताबाई पाटील, सौ. मीनाबाई शिरसाठ यांनी अनुमोदन दिले आहे.
    *वृक्षारोपण प्रकरणी दोषी अधिकाऱ्यां वर                    कारवाई का होत नाही* ?
           वृक्षारोपण प्रकरणी दोषी पाणीपुरवठा अभियंता यांच्यावर कारवाई का केली जात नाही, आणि करवाई होत नसेल तर त्याबाबत आपल्याला का जबाबदार धरण्यात येऊ नये? असा जाब पालकमंत्री यांनी मुख्यधिकारी यांना विचारला. नेहमीप्रमाणे मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा निकालाचा हवाला देऊन,  गोल गोल उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
       त्यावर पालकमंत्री यांनी मुख्याधिकारी यांना सुनावले की १६२९ झाडे लागलीच नाहीत म्हणजे हे आमच्यावर उपकारच झालेत, आणि तक्रार नसती झाली तर ती झाडे गडपच झाली होती मग? आणि  तुम्ही  करत नसल्यास तरी सदर प्रकरणी कारवाईबाबत लक्ष घालू असेही सूचित केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने