*मित्र निघाला सख्खा वैरी..दगडाने ठेचून मित्रानेच केला मित्राचा खून.. घटनास्थळी सापडले, 3 मोठे दगड, 2 डिसपोझल ग्लास, No1 मॅक्डॉल दारूची बॉटल..*
उमरखेड दि.०१ : सून तीन किलोमीटर अंतरावरील नागपूर तुळजापूर महामार्गावर पैनगंगा नदीच्या पुलाजवळ 20 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची खळबळ जनक घटना दिनांक 30 जुलै 2021 रोजी उघडकीस आली. तर मित्रानेच केला मित्राचा खून..! मृतक अक्षय वसंतराव करे असे युवकाचे नाव आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी केवळ 5 6 तासातच मुख्य आरोपी आकाश लोंढे याला ताब्यात घेऊन जेलबंद करून त्याच्यावर गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केली आहे.
सदरील घटना ज्ञानेश्वर कदम यांच्या शेतात कार्तिक ट्रेडिंग कंपनी च्या शेड समोर मृत्यूदेह दिसल्याने ज्ञानेश्वर कदम यांनी उमरखेड पोलीस स्टेशनला संपर्क साधुन घटनास्थळाची माहिती दिली होती. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन, ठाणेदार आनंद वागतकर हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. प्रथम दर्शनी सदर युवकाच्या डोक्याला मार लागलेला व गंभीर अवस्थेत आढळून आला होता.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्यांना 2, 3 मोठे दगड, 2 डिसपोझल ग्लास, No1 मॅक्डॉल दारूची बॉटल मिळाली.
तर मृतकांचे 4 मित्र संशयित घेऊन घटनेचा तपास करण्यात आला असता तपासातून आरोपी आकाश लोंढे यानी मृतक अक्षय करे यांचा दगडाने ठेचून मित्रानेच केला मित्राचा खून अशी खळबळ जनका माहिती पुढे आली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आनंद वागतकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गाडे, पि एस आय विनीत घाटोळ, एम. पी. सी विजय पतंगे, संदीप ठाकुर करीत आहेत.