नगरपालिका असुनही नसल्यासारखी,मागील चार वर्षांत सर्वाधिक बेकायदेशीर बांधकाम व चौकाचौकात लाँऱ्या वाढल्या....*बेशिस्त अतिक्रमणाने नागरिकांची ससे होलपट..!*


 

नगरपालिका असुनही नसल्यासारखी,मागील चार वर्षांत सर्वाधिक बेकायदेशीर बांधकाम व चौकाचौकात लाँऱ्या वाढल्या....*बेशिस्त अतिक्रमणाने नागरिकांची ससे होलपट..!*

*दोंडाईचा-*दि.०१(प्रतिनिधी) येथे नुकतेच मागील दोन आठवड्यापासून दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी यांनी राजपथ रस्ता व बसस्टँड परिसरातील इतर दुकानांनपुढील, सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर उभ्या व्यापार-व्यवसाय करणाऱ्या लाँऱ्या हातगाड्या काढत दुकानदारांना तात्पुरता दिलासा दिला आहे. जर पोलीस निरीक्षक सार्वजनिक रस्त्यावरील लाँऱ्या हातगाड्या काढू शकतात तर दोंडाईचा नगरपालिका प्रशासन काय झोपलेले आहे, असा प्रश्न दरवर्षी विविध टँक्स भरणाऱ्या दुकानदारांना पढला आहे. मागील चार वर्षात चौकाचौकातील लाँऱ्या हातगाड्या, बेकायदेशीर बांधकामे गावात वाढली आहे. त्यात नगरपालीकेला कितीही तक्रारी करा. नगरपालिका प्रशासन प्रेशरखाली डोळे बंद करते.म्हणजे दोंडाईचा नगरपालिका असुन ही नसल्यासारखी असल्याची जाणीव नागरिकांना होत आहे. म्हणून दरवर्षी लाखोने टँक्स भरणाऱ्या दुकानदांरापुढचे लाँऱ्या हातगाड्या पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी काढल्याने सर्व व्यापारी लवकरच जाहीर सत्कार करणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने