*
*काँग्रेस पक्षाच्या व्यर्थ न हो बलिदान अभियानात*
*हजारोच्या संख्येने सहभागी व्हा -आ.कुणाल पाटील**
धुळे- दि.,०१(प्रतिनिधी) देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कॉग्रेसच्या नेत्यांनी प्राणाची आहूती दिली आणि देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशात स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाला उजाळा मिळावा म्हणून काँग्रेसच्या व्यर्थ न हो बलिदान या अभियानात जिल्हयातील जनतेने हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांनी केले.
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्यावतीने दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी भारतीय स्वातंत्र्याला 74 वर्ष पूर्ण होवून 75 वर्षात आपण पदार्पण करीत आहोत. स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्यासाठी आज दि.1 ऑगस्ट 2021 ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत व्यर्थ न हो बलिदान हे अभियान राबविले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आज दि. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2021 दरम्यान विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. त्याअनुषंगाने धुळे जिल्हयात हे अभियान राबविण्यात येणार असून त्या पार्श्वभूमीवर आज दि.31 जुलै रोजी आ.कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत पूर्वतयारीसाठी बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि,भारतीय स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसच्या नेत्यांनी बलिदान देत स्वातंत्र्य मिळविले. या लढ्यात अनेकांना आपल्या प्राणाची बाजी लावावी लागली.मात्र आज भाजपासारखा पक्ष भारतीय स्वातंत्र्याचा प्रेरणादायी लढा पुसण्याचे काम करीत असून हुकूमशाहीकडे देश नेण्याचे काम केले जात आहे. स्वातंत्र्याचा इतिहास पुसून भाजपा तरुणांमधील देशप्रेम कमी करीत आहे. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीचा खरा इतिहास लोकांसमोर यावा म्हणून काँग्रेस राबवित असलेल्या व्यर्थ न हो बलिदान या अभियानात हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आ.पाटील यांनी केले. यावेळी माजी मंत्री हेमंतराव देशमुख यांनी मार्गदर्शन करतांना भाजपावर टीकास्त्र सोडीत देशातील कोणत्याही भाजपा नेत्यांचे स्वातंत्र्य कोणतेही योगदान नाही. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी फितूराची भूमिका वठविली आहे. त्यामुळे कष्टाने मिळविलेले स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात आले असून भाजपा आणि नरेंद्र मोदी देशाला पारतंत्र्यात ढकलण्याचे काम करीत आहेत.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर प्रास्ताविकपर भाषणात म्हणाले कि, भाजपामुळे देशात जातीयवादी शक्ती डोके वर काढत आहेत.सर्वधर्म समभाव असलेल्या भारतात समाजासमाजात भांडणे लावून देशातील तरुणांची डोके भडकविण्याचे काम भाजपा करीत आहे.स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणींना उजाळा देत देशात एकता नांदावी आणि काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान आजच्या तरुण पिढीसमोर यावे म्हणून काँग्रेस पक्ष व्यर्थन हो बलिदान हे अभियान राबवित आहे.धुळे जिल्हयातील चिमठाणा क्रांतीस्मारक येथे होणार्या या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आदिवासी मंत्री के.सी.पाडवी, वैद्यकिय शिक्षण मंत्री ना.अमित देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.अभियानाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकिला माजी मंत्री हेमंतराव देशमुख, काँग्रेस कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील, माजी खासदार बापू चौरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, काँग्रेस शहराध्यक्ष युवराज करनकाळ, माजी आ.प्रा.शरद पाटील, ज्येष्ठ नेते साबीर शेठ, उत्तमराव देसले,व्ही.यू.पाटील, रमेश श्रीखंडे, गुलाबराव कोतेकर, बाजीराव पाटील,साहेबराव खैरनार, रावसाहेब पवार, प्रकाश पाटील, उत्तमराव माळी, कृऊबा प्रशासक रितेश पाटील, धुळे तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष डॉ.दत्ता परदेशी, दिलीप शिंदे, एन.डी. पाटील, साक्री काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, अविनाश महाजन,माधव बडगुजर,दिपक देसले,दिनेश महाले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, माजी अध्यक्ष हर्षल साळुंके, राहूल माणिक,प्रविण पवार,धिरज अहिरे, विश्वास बागुल,राजेंद्र देवरे, हेमराज पाटील,बापू खैरनार,किशोर बागल,अविनाश शिंदे यांच्यासह धुळे,शिरपुर,शिंदखेडा,साक्री आणि धुळे शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.