*ओ शेठ तुम्ही नादच केला थेट* या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला लावलं वेड..गाण्याची *निर्माती,लेखिका,गीतकार, संध्या ज्ञानेश्वर केशे* व तिचा सहाय्यक *प्रणिकेत खुने*यांचा झाला गौरव..
चांदवड दि.३०(प्रतिनिधी) *ओ शेठ तुम्ही नादच केला थेट* या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला वेड लावलं, *सर्व गाण्यांचं रेकोर्ड ब्रेक करणारं हे गीत आज महाराष्ट्रात गाजत आहे.फेसबुक,इन्स्टाग्राम, इन्स्टाग्राम रीळ,डी जे, व्हाट्सअप,न्यूज,इ.वर हे गाणं आज टॉप वर आहे.* या गाण्याची *निर्माती,लेखिका,गीतकार, *नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड.जि.नाशिक.* या, विद्यालयाची माजी विद्यार्थिनी *संध्या ज्ञानेश्वर केशे* व तिचा सहाय्यक *प्रणिकेत खुने* यांनी आज गुरुवार दि.२९ जुलै २०२१. रोजी विद्यालयाला भेट दिली. या यशानंतरचा दोघांचा पहिला सत्कार शाळेकडून व्हावा या इच्छेतून हा पहिला *सत्कार शाळेचे पर्यवेक्षक श्री.कृ.बा. लोखंडे सर,व जेष्ठ शिक्षक श्री. आ.वि.सोनवणे सर यांनी केला.* संध्या केशे व प्रणिकेत यांनी लिहिलेल्या व कंपोज केलेल्या या गाण्याच्या यशाची कथा आज त्यांच्याच कडून विद्यार्थ्यांना ऐकण्यास मिळाली. *या दोघांची छोटेखानी मुलाखत शाळेचे कलाशिक्षक श्री देविदास हिरे सर यांनी घेतली.* संध्या केशे ही या शाळेची गीतमंचाची अतिशय हुशार विद्यार्थिनी, विद्यालयीन काळातील आठवणी तिने इतर विद्यार्थ्यांपुढे व्यक्त केल्या. ज्या १०वी च्या बाकावर ती शेवटच्या वर्षी बसली तेथे बसून तीने फोटो काढले. सर्व शिक्षकांसोबत तीने सहभोजन केले.शाळेविषयी प्रेम व आपुलकी आजही तिच्या मनात कायम होती शाळेतून घरी जाऊच नये असे वाटते असे भावुक उदगार तीने जाताना व्यक्त केले. अनेक विद्यार्थ्यांनी या दोघासोबत आवडीने सेल्फी काढला. *दररोज एक मिलियन व्हीव्ज "ओ शेठ ,,,तुम्ही नादच केला थेट."* या गाण्याला मिळत आहेत त्यांच्या या *यशाचे भरभरून कौतुक विद्यालयातील मा.मुख्याध्यापक श्री.आर. डी. जाधव सर,मा.पर्यवेक्षक श्री. कृ.बा.लोखंडे सर तथा सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांच्या मार्फत करण्यात आले.* संध्या व प्रणिकेत या दोघांना त्यांच्या पुढील संगीतमय यशासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा विद्यालयातर्फे देण्यात आल्या.