*पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचे इयत्ता १२ वी सी.बी एस ई (CBSE) परीक्षेत घवघवीत यश*....
चोपडा;दि.३० (प्रतिनिधी) :---
दि. ३० जुलै रोजी घोषित करण्यात आलेल्या इयत्ता १२ वी सी.बी एस ई (CBSE) च्या निकाल १००℅ लागला असून यशाची परंपरा कायम ठेवली आहे. ओम रामलाल जैन या विद्यार्थ्याने ९३.८०℅ गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. कु. चेतश्री योगेश सनेर या विद्यार्थ्यीनीने ९३.४०℅ गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच वरद योगेश काबरा ह्या विद्यार्थ्याने ९3.२०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. एकूण ३२ विद्यार्थ्यांपैकी ११ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण मिळाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक भैय्यासाहेब पंकज बोरोले, उपाध्यक्ष अविनाशजी राणे, नारायण बोरोले, भागवत भारंबे, एम.व्ही.पाटील, व्ही.आर. पाटील, डॉ. किशोर पाठक, सौ.निता पाटील, सौ.रेखा पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे भ्रमणध्वनीवर अभिनंदन केले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य मिलिंद पाटील, के.पी.पाटील व सर्व शिक्षक वृंद क्रिष्णाकुमार शुक्ला, निलेश पाटील, चंद्रकांत पाटील, इब्राहिम तडवी, सौ.धनश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी अधिक परिश्रम घेतले व त्यांचे फलीत म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.