शिंदखेडा येथे आप्पासाहेब देसले नगर येथे नगरपंचायत वतीने गटनेते अनिल वानखेडे व मुख्खाधिकारी प्रशांत बिडकर यांच्या हस्ते वृक्षारोपण*


 *शिंदखेडा येथे आप्पासाहेब देसले नगर येथे नगरपंचायत वतीने गटनेते अनिल वानखेडे व मुख्खाधिकारी प्रशांत बिडकर यांच्या हस्ते वृक्षारोपण*                     

 शिंदखेडा तालुका प्रतिनिधी( यादवराव सावंत)                           शिंदखेडा- येथील आप्पासाहेब देसले नगर येथील मोकळया जागेत नगरपंचायतच्या वतीने गटनेते अनिल वानखेडे व मुख्खाधिकारी प्रशांत बिडकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. हयावेळी आंबा ,वड ,लिंब .पिंपळ ,पडस .जांभुळ .बदाम आदी प्रकारच्या पन्नास रोपांची लागवड करण्यात आली.   यावेळी उपनगराध्यक्ष भिला पाटील, नगरसेवक उदय देसले , प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे ,नगर रचनाकार ओमकार सहाणे ,भाजपचे शहराध्यक्ष प्रविण माळी ,गणेश मराठे ,वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष.योगेश चौधरी ,जीवन देशमुख ,संतोष वाघ ,न्हानभाऊ पाटोळे ,राहुल पाटील ,भिमा सोनवणे ,ज्ञानेश्वर पाटील ,आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने