"आॕन द स्पाॅट ..प्राब्लेम साॅल" बैठकीचे आयोजन.. नव्या प्रशासकिय इमारतीत म्युनिसिपल हायस्कूल मागे जरूर या..! चोपडा तालुक्यातील जनतेला आपल्या समस्या सोडविण्यासाठी मोठ्ठा चान्स.. पालकमंत्री व आमदार आणि सर्व विभाग अधिकाऱ्यांची जम्बो टीमची खास उपस्थिती..
*चोपडा दि.२९(प्रतिनिधी)येथील नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय (म्युनिसिपल हायस्कूलच्या मागे)चोपडा* येथे
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार सौ. लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे (शिवसेना सहसंपर्क प्रमुख रावेर लोकसभा) यांच्या प्रमुख उपस्थितीत चोपडा तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखाची आढावा बैठक दिनांक ३०/०७/२०२१ वार शुक्रवार रोजी ठिक दुपारी ३:०० वाजता आयोजित करण्यात आली आहे
तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडण्यासाठी पुढे यावे., सदर बैठकीत शासकीय स्तरावरील आपल्या समस्या घेऊन याव्यात, जेणेकरून जास्तीत जास्त समस्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडून त्यावर योग्य ती उपाययोजना करता येईल. असेही कळविण्यात आले आहे.