*कोळी समाजाने दिलेल्या आशीर्वादामुळे मी मंत्री पदापर्यंत आले: केंद्रीय स्वस्थ आणि परिवार कल्याण राज्यमंत्री डॉ भारतीताई पवार*
नवी दिल्ली दि.२९ :
कोळी समाजाने मला निवडणुकीमध्ये भरभरून मतदान केले त्यांच्या आशीर्वादानेच मी खासदार होऊन आज मंत्री पद भूषवित असल्याचे प्रतिपादन केंद्रीय स्वास्थ आणि परिवार कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती ताई पवार यांनी प्रतिपादन केले. कोळी महासंघाचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सदस्य रमेश दादा पाटील यांनी त्यांच्या दालनांमध्ये जाऊन त्यांचा सत्कार केला त्यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस राजहंस टपके, उपाध्यक्ष देवानंद भोईर, युवा नेते ऍड चेतन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते