आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते..चोपड्यात आज विठ्ठल मंदिर येथे आयुष्मान भारत योजनेचे कार्ड वाटप..*


 

*आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते..चोपड्यात आज विठ्ठल मंदिर येथे आयुष्मान भारत योजनेचे कार्ड वाटप..* 

 चोपडा दि.३०(प्रतिनिधी)   :    चोपडा तालुक्याच्या विद्यमान आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ३० जुलै रोजी सकाळी ९ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चोपडा येथली पाटील गढीभागातील विठ्ठल मंदिर येथे चोपडा शहरातील गरीब लोकांना आयुष्यमान भारत योजनेची नोंदणी व योजनेचे कार्ड वितरीत करण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांनी सोबत येतांना आधार कार्ड व रेशन कार्ड सोबत आणावे अशी माहिती शिवसेनेचे कार्यकर्ते जगदीश मराठे यांनी दिली.

            आयुष्यमान भारत योजनेत येणा-या नागरीकांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा देण्यात येणार आहे. भारत शासनाची आरोग्य योजना आयुष्मान भारत योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 1 एप्रिल 2018 रोजी संपूर्ण भारतात राबविण्यात आली. 2018 च्या वित्तीय  अर्थसंकल्प अधिवेशनात ही योजना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केली. या योजनेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि मोदी केअर योजना म्हणूनही ओळखले जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ लोकांना (बीपीएल धारकांना) आरोग्य विमा प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. त्याखालील प्रत्येक कुटुंबासाठी 5 लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यात येईल. 10 कोटी बीपीएल धारक कुटुंब (सुमारे 50 कोटी लोक) या योजनेचा लाभ घेण्यास सक्षम असतीलया योजनेंतर्गत केंद्र सरकार देशातील सर्व गरीब कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा प्रदान करेल. याचा अर्थ असा की या योजनेस पात्र असणारी कोणतीही गरीब व्यक्ती खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने