*व्यसनमुक्ती संघटनेच्या गीतांजली कोळींना 28 हजार रुपयांचा गंडा; देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.*
*प्रतिनिधी संजय कोळी*
दोंडाईचा:- दि.३०: 29/7/2021रोजी आॅनलाईन फसवणूक च्या संदर्भात सायबर गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्तव्य दक्ष अधिकारी मा. श्री. सतिश गोराडे साहेबांची भेट घेतली.... व माझे आॅनलाईन फसवणूक होऊन गेलेले 28हजार रूपये... साहेबांनी दिलेल्या सुचनेनुसार सायबर सेल च्या मनिषामँडम यांनी केलेली तत्परतेची कारवाई यामुळे फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांच्या अकाउंट मध्ये जाणारे माझे पैसे थांबविण्यात आले आहेत.... यासाठी मा. श्री. गोराडे साहेबांचे आभार मानले. मागील काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यासाठी मदत म्हणून महागडे लॅपटॉप तसेच अनेक उपयोगी वस्तूंचे माझ्या नावाचे पार्सल दिल्ली एअरपोर्ट वर आले आहे असे बतावणी करून माझी 28हजार रूपयांची फसवणूक करणाऱ्या दिल्ली ची महिला (पत्ता-आसामचा आहे) हिच्या विरुद्ध देवपूर पोलीस स्टेशन येथे काल तक्रार दाखल केली याकामी देवपूर पोलीस स्टेशन चे मा. श्री. चंद्रकांत पाटील साहेब तसेच कर्मचारी यांनी अतिशय मोलाची मदत केली.... माझ्या धुळे पोलीस बांधवांनी वेळीच केलेल्या तत्परतेच्या धडाडीच्या, कामगिरी मुळे मला मी दुसऱ्या कडून कर्जाने घेतलेले पैसे थोड्याच दिवसात परत मिळणार आहेत.. याबद्दल सतर्क कार्यतत्पर धुळे पोलीसांचे मनपूर्वक आभार...
यानिमित्ताने सर्वांना एकच आवाहन आहे कि सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टी ख-या असतातच असे नाही कृपया कोणीही पैसे विषयी असणाऱ्या भुलथापांना बळी पडू नका व सोशल मीडिया चा वापर जपून करा.. असेसौ. गीतांजली कोळी. सामाजिक कार्यकर्ती. धुळे यांनी कळविले आहे