माहिती अधिकाराचा दणका, ग्रामपंचायत असली ग्रामसेवकास 15 हजार रुपयांचा दंड ..वेतनातून 2 समान हप्त्यात रक्कम वसूल करण्याचे निर्देश..!


 


माहिती अधिकाराचा दणका, ग्रामपंचायत असली ग्रामसेवकास 15 हजार रुपयांचा दंड ..वेतनातून 2 समान हप्त्यात  रक्कम वसूल करण्याचे निर्देश..! 


शिरपूर दि.३१(प्रतिनिधी)- शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत असली या गावाच्या तत्कालीन ग्रामसेविकास  माहिती अधिकारा अंतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केली म्हणून राज्य माहिती आयोगाने 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते महेंद्र प्रेमसिंग जाधव (संपादक निर्भीड विचार) यांनी सन 2017-18 मधील ग्रामपंचायत शिंगावे व असली या गावातील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत झालेला  जवळपास 1 करोड रुपयांचा भ्रष्टाचार उघड केला होता. सदर प्रकरणात अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात व दोन सरपंच यांच्याविरोधात गुन्हे दाखल असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सदर प्रकरणाशी संबंधित माहितीची मागणी सन 2017 मध्ये करण्यात आली होती. मात्र तत्कालीन ग्रामसेविका श्रीमती वैशाली निकुंबे यांनी  हेतू पुरस्कृत सदरची माहिती देण्यास टाळाटाळ केली होती. यासंदर्भात झालेल्या प्रथम अपील व आयोगाकडील अपिलाच्या वारंवार देण्यात आलेल्या नोटीसी  वर कोणताही खुलासा न करता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली होती. यानंतर 2021 मध्ये आयोगाने दिलेल्या अंतिम नोटिशीला उत्तर देताना त्यांनी मला दप्तर न मिळाल्यामुळे माहिती देता आली नाही असा खुलासा सादर केला होता. मात्र आयोगाने सदरच्या खुलासा अमान्य करून आपण माहिती अधिकार अधिनियमा च्या भंग केला असून अर्जदारास माहिती देण्यास सतत 3 वर्षे टाळाटाळ केली .आहे शिवाय आयोगाची देखील दिशाभूल केली आहे आणि अर्जदारास माहिती देण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ केली आहे असे दिसत असल्याने आयोगाने त्यांना पंधरा हजार रुपये दंडाची शास्त्तीची कारवाई केली आहे. आणि विस्तार अधिकारी ग्रामपंचायत यांना त्यांच्या माहिती आयोगास कळवण्या याबाबत अवगत केले आहे.

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने