चोपडा न.प.हद्दीतील रस्त्याच्या काँक्रिटीकरणास सुरुवात..

 



*चोपडा दि. 26 (प्रतिनिधी)* शहरातील न.प.हद्दीतील गोरगांवले रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामास सुरुवात करण्यात आली असून येत्या आठ ते दहा दिवसात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. याबाबत गोरगांवलेचे माजी सरपंच श्री.व सौ.आशाबाई जगन्नाथ बाविस्कर यांनी चोपड्याचे तहसीलदार अनिल गावित व जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेकडे कॉलनीवासियांतर्फे निवेदन दिलेले होते. तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्याकडेही तगादा सुरू होता.आपल्या व्रुत्तपत्रीय बातम्यांमुळेही शासन प्रशासन वेळीच जागे झालेले होते.यासाठी न.प.चे गटनेते व नगरसेवक जीवनलाल चौधरी यांनीही ह्या रस्तादुरुस्तीच्या कामासाठी अडसर ठरणारी न.प.ची पाईपलाईन त्वरित काढून देऊन हा रस्ता मोकळा करून दिलेला होता.ह्या रस्त्यावरील अतिक्रमण मोकळे केल्यामुळे हा रस्ता त्वरित कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे.

            याबाबत चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर,आदर्श घुमावल बु.चे विद्यमान सरपंच वसंतराव पाटील, एस्.टी.कोळी संघटनेचे पदाधिकारी मधुसूदन बाविस्कर,लखिचंद बाविस्कर, वैभवराज बाविस्कर यांनी केलेल्या प्रयत्नांनाही यश आलेले आहे.न.प.हद्दीतील गोरगांवले रस्त्याच्या आजुबाजूच्या कॉलनीतील रहिवासियांना वर्षानुवर्षांपासुन ह्या रस्त्यावरून वापरतांना मरणयातना सहन कराव्या लागत होत्या.आता हा रस्ता मजबुत व कॉंक्रिटीकरण होत असल्याने कॉलनीवासियांत आनंदाचे वातावरण आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने