अघोषित आणीबाणी विरुद्ध काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली शपथ

  


चोपडा --26 जून 2021 रोजी चोपडा शहर व तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या अघोषित आणीबाणीविरुद्ध लोकशाहीच्या रक्षणासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी शपथ घेऊन संकल्प केला. मोदी सरकार सर्व प्रकारच्या लोकशाही रचना उद्धवस्त करण्याच्या प्रयत्नात असून, देश कमकुवत करत असल्याने व त्यांच्या विरोधात बोलणार्‍याला देशद्रोही ठरवत असल्याने ,लोकशाहीस संकटात आलेलि आहे. विरोधी बोलणाऱ्याच्या मागे सीबीआय सारखे, इडी सारखे ससेमिरा लावून त्रास दिल्याचे प्रकार होत आहेत .लोकांचा आवाज दाबला जात आहे. मिडीयाला स्वातंत्र नाही. ही अघोषित आणीबाणी असून याविरुद्ध काँग्रेस कार्यकर्त्यांनी शपथ् घेऊन जनतेमध्ये जाऊन जागृती निर्माण करण्याचा संकल्प घेतला आहे . यावेळी चोपडा शहर काँग्रेसचे अध्यक्ष के. डी .चौधरी, तापी सहकारी सूतगिरणीचे संचालक राजेंद्र पाटील, कांतीलाल सनेर्, फातिमा पठाण, इलियास पटेल, मंगेश भोईटे, रमाकांत सोनवणे किरण सोनवणे देवकांत चौधरी, जितेंद्र चौधरी , हमीदखा पठाण ,श्याम शिंपी आदी कार्यकर्त्यांसह अनेकांनि शपथ घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने