*-खासदार रक्षाताई खडसे..*
जळगाव दि.२४ ( प्रतिनिधी )रावेर लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय,कर्तव्यदक्ष खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आज दि.24 मे 2021 रोजी मा.जिल्हाधिकारी,जळगाव यांना लाॅकडाऊन मध्ये शिथिल होणार्या नियमांमध्ये व्यापारी वर्ग व हात मजुरांना अधिक सवलत मिळावी म्हणून पत्रव्यवहार केला..
संपूर्ण देशभरात कोविड -19 महामारीची दुसरी लाट आली आहे,राज्यातही ही लाट प्रभावी आहे,यावर उपाय म्हणून राज्य शासनाने 'ब्रेक द चेन" अंतर्गत निर्बंध लावले आहेत,त्यानुसार सकाळी 11 वाजेपासुन लाॅकडाऊन चा चे नियम लागु होतात, नागरिक व व्यापार्यांच्या सहकार्यामुळे आता कोविड-19 चा प्रभाव हा जळगाव जिल्ह्यातून कमी होतांना दिसुन येत असून बाधितांचा आकडा सुध्दा कमी होत आहे,
म्हणून मागिल वर्षापासुन कोविड -19 मुळे राज्यशासनाने लावलेल्या लाॅकडाऊनमुळे नागरिकांसह,व्यापारी वर्ग व व्यापारावर अवलंबुन असलेले हातमजुर त्रस्त झाले आहेत,
म्हणून लाॅकडाऊनच्या शिथिल होणार्या नियमांमध्ये समस्त व्यापारी वर्ग,व त्यांच्यावर अवलंबुन असलेल्या हात मजुरांचा पोटा पाण्याचा विचार करुन पुढील काळासाठी नविन नियम आखण्यात यावेत असेही खा. रक्षाताई खडसे यांनी स्पष्ट केले आहे.