3 लाख 91 हजार 7 94दिव्यांगांना लाभ* जळगाव दि. 25(प्रतिनिधी) राज्यभर कोरोनाने धुमाकूळ घातला असून दिव्यांग व्यक्तींचे ससेहोलपट होत असतांना शासनाने गांभीर्याने दखल घेऊन दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र स्थापन करून दिव्यांग शाळेतील शिक्षक किंवा शिक्षकेत्तर कर्मचारींची नियुक्ती करून सेवा प्रदान करण्याचा आदेश शासनाने आजच निर्गमित केला आहे. शिवाय समाज कल्याण अधिकारी यांनी नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे
राज्यातील विविध दिव्यांग संस्थांनी दिव्यांग व्यक्तींच्या विविध समस्यांचा बिमोड करण्यासाठी संघटीतपणे जोरदार मागणी केली होती त्या अनुषंगाने शासनाने कोरोना लसीकरणासह उपचार व तपासणी करण्यासाठी दिव्यांग केंद्र स्थापन करून सेवा देण्याचे सूचित केले आहे दोन किंवा अधिक अधिकारी नेमून आठवड्यातून दोन दिवस सेवा सांगितले असल्याने आता दिव्यांग व्यक्तींना रांगेत उभं राहून तातकळत त्रास सहन करावा लागण्याचा महत्त्वपुर्ण प्रश्न मिटला आहे. दिव्यांग पोर्टल आधारित 3 लाख 91हजार 794 दिव्यांग व्यक्तींना लाभ मिळणार आहे. त्यात 45 वर्षावरील 1लाख 40 हजार 569 दिव्यांग व्यक्तींचा समावेश आहे. दिव्यांग युनिक आयडी पोर्टलवर समाज कल्याण अधिकारी यांनी लक्ष ठेवून नव्याने होत राहणाऱ्या आकड्यांची बदल वारंवार आरोग्य विभागाला सादर करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले आहे