~~~~~~~~~~~
*कोरोना टेस्टिंग प्रशिक्षण*
~~~~~~~~~~~
*मुंबई दि. 25 :-* राज्यभरात 70 हजार आशा स्वयंसेविका असून
त्यांची कामगिरी उत्तम आहे. कोरोना सारख्या महामारीत त्याचे मोलाचे योगदान लाभत आहे त्याची महत्त्वपुर्ण भूमिका लक्षात घेऊन त्यांना कोरोना टेस्टिंग प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जातात. ग्रामीण भागातील कोरोनाची साथ रोखतानाच आता आशा स्वयंसेविकांना रॅपीड ॲण्टीजेन चाचणी आणि स्वयंनिदान चाचणी करण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
बैठकीत राज्याच्या सरासरी एवढ्या पॉझीटिव्हीटी दरापेक्षा 18 जिल्ह्यांतील पॉझीटिव्हीटी दर जास्त आहे तेथे होम आयसोलेशन (गृह अलगीकरण) बंद करून कोविड केअर सेंटरमध्ये अलगीकरणाची सुविधा निर्माण करण्याची सूचना देण्यात आली आहे. 15 वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून ग्रामपंचायतींनी 25 टक्के निधी हा कोरोना केअर सेंटर उभारणीसाठी वापरण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी दिल्याची माहिती आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी दिली.