जळगाव दि. 25 (प्रतिनिधी ) नगरपालिकेचे माजी नगरसेवक व राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष, जळगाव शहरातील प्रमुख नेते हाजी गफ्फार मलीक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने काल रात्री दुख:द निधन झाले.
जळगाव जिल्हा आणि राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. गत काळात ते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक होते . आपल्या भाषणशैलीत शेरोशायरीने ते अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. गफ्फार मलीक यांच्या जाण्याने जळगावची मोठी हानी झाली खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे