रेड झोन जिल्ह्यात होम आयसोलेशन बंदचा निर्णय :आरोग्य मंत्री

मुंबई, दि. 25 राज्यातील प्रमुख शहरांत जरी करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असली तरी राज्यातील १८ जिल्हे अजूनही रेड झोनमध्ये असून या जिल्ह्यात करोनाचा रुग्णांची संख्यांही अधिक आहे. या जिल्ह्यांसाठी आरोग्य विभागानं होम आयसोलेशन बंदचा महत्त्वपुर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज म्युकरमायकोसिस या आजारासंदर्भात एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत हा उपरोक्त निर्णय घेण्यात आला तसेच 
'रेड झोनमध्ये असलेल्या ज्या १८ जिल्ह्यांत पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे त्या जिल्ह्यांना दोन सूचना देण्यात आल्या आहेत. एक म्हणजे होम आयसोलेशन बंद करा आणि कोविड केअर सेंटर वाढवा, व दुसरी कोविड केअर सेंटर वाढवून सगळ्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये आयसोलेट करा,' असही आरोग्य मंत्र्यांनी म्हटलं आहे. तसंच, राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्के इतका आहे तर, पॉझिटिव्हीटी रेटदेखील कमी होत असल्याचे स्पष्ट केले 
'म्युकर मायकोसिसचे राज्यात २२४५ रुग्ण आहेत. आरोग्य विभानाने या आजाराला नोटिफाईट आजार म्हणून घोषित केलंय. त्याबाबतची माहिती शासनाला देणं बंधनकारक आहे. आजारासाठी लागणाऱ्या एम्फोटेरेसीन औषधाचं नियंत्रण केंद्राकडे आहे. केंद्र सरकारने औषध दिल्यावर आपण त्याचे प्रत्येक जिल्ह्यात वाटप करतो. त्यामुळे रुग्णांची माहिती देण्याच्या सूचना प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच या आजारावर मोफत उपचार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. या रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येत आहेत,' अशी माहिती ना. टोपे यांनी दिली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने