भालोद आदिवासी वस्तीच्या समस्यांवर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे आंदोलन

 भालोद आदिवासी वस्तीच्या समस्यांवर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे आंदोलन 

चोपडा दि.१७(प्रतिनिधी):जळगाव जिल्ह्यातील पेसा (PESA) क्षेत्रातील स्थानिक आदिवासी बांधवांवर सातत्याने होणारा प्रशासकीय अन्याय, नियमांची पायमल्ली आणि प्रलंबित मागण्यांविरोधात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद (महाराष्ट्र राज्य) आता पूर्णपणे आरपारच्या लढ्याच्या भूमिकेत आली आहे. संघटनेचे उप प्रदेशाध्यक्ष रामदास भाईदास पावरा यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल येथील प्रकल्प अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे  निवेदन सादर करण्यात आले.

प्रशासनाला २१ दिवसांत  “जर विहित मुदतीत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर यावल प्रकल्प कार्यालयाच्या मुख्य दरवाजाला कुलूप ठोकून (ताळेबंद) तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.  असा इशारा दिला आहे.निवेदनात विविध  मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

यावेळी  जिल्हाध्यक्ष मुराद तडवी, रोनक तडवी, राजू दादा तडवी, रमोद पाडवी, सचिन पावरा, प्रवीण पावरा, जयदास पावरा, समाधान पावरा, सलीम छबु कुसुंबा, नसीर इब्राहिम लोहारा, सरफराज एकबार, फिरोज अब्बास सांगवी, सरदार बलदार हंबर्डे, सलीम सुभान पाल, राजू अकबर करजोत, नबाब दादा पिपरी, जहांगीर अहिरवाडी, जाबीर कबीर चिचाटे, फकीरा दादा नायगाव, नूर मोहम्मद इब्राहिम मोहगन, भिकारी  युवरा, नासिर  भाटकेळा, बबीता तडवी भटकेळा, जुबेदा बाई आमदा, आजराबाई आमदा तसेच भालोद महिला मंडळ गटाच्या महिला व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने