लोक अदालतीमुळे समझोता झाल्यास पक्षकारांचा वेळ व पैसा यामध्ये बचत होऊन मानसिक व शारीरिक त्रासातून मुक्त होतात..तहसीलदार भाऊसाहेब थोरात

 लोक अदालतीमुळे समझोता  झाल्यास पक्षकारांचा वेळ व पैसा यामध्ये बचत होऊन मानसिक व शारीरिक त्रासातून मुक्त होतात..तहसीलदार भाऊसाहेब थोरात


चोपडा दि.१७(प्रतिनिधी): महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत दि. 17 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी ११.०० ते  दुपारी २.०० या कालावधीत तहसील कार्यालय, चोपडा येथील बैठक सभागृहात संपन्न झाली.

सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले...तसेच श्री. भाऊसाहेब थोरात यांनी आपले प्रास्ताविकात  मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली व  मुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून ही महसुल लोक अदालत आयोजित करण्यात आलेली आहे असे नमूद करून या  माध्यमातून नागरिकांना जलद, सुलभ व सामोपचाराने न्याय मिळवून देण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. महसूल विभागात तहसीलदार, नायब तहसीलदार मंडळ अधिकारी स्तरावर विविध दावे दाखल करण्यात येऊन न्यायालयीन कामकाज चालते, प्रामुख्याने मामलेदार अधिनियम कलम 5, महाराष्ट्राचे मित्र अधिनियम कलम 143, बांध फोड , पाण्याचे प्रवाह अडवीणे तसेच कुळ कायद्याअंतर्गत दावे दाखल होतात, यामध्ये वादी आणि प्रतिवादी व अन्य पक्षकार यांना सुनावणी व अन्य न्यायालयीन कामकाजासाठी न्यायालयामध्ये उपस्थित राहून बाजू मांडावी लागते, विविध कारणांमुळे हे दावे प्रलंबित राहिल्याने पक्षकारांचा वेळ व पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो तसेच एका स्तरावर निकाल लागल्यानंतर असंतुष्ट पक्षकार वरिष्ठ न्यायालयात पुन्हा अपील किंवा पुनरिक्षण अर्ज दाखल करतात यामुळे हे दावे वर्षानुवर्ष सुरू राहतात. मात्र लोक अदालतीमुळे समझोता  झाल्यामुळे पक्षकारांचा वेळ व पैसा यामध्ये बचत होऊन मानसिक व शारीरिक त्रासातून मुक्त होता येते असे प्रतिपादन केले...

या लोक अदालतीत महसूल विभागातील विविध प्रलंबित दावे, प्रकरणे व वाद तडजोडीने आणि परस्पर सामंजस्याने निकाली काढण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले, ४९  प्रकरणे सामोपचाराठी ठेवली होती त्यामध्ये यश येऊन मौजे गरताड येथील एक दावा परस्पर सामंजस्याने मिटवण्यात आला...

लोक अदालतीच्या अध्यक्षस्थानी  श्री. दीपक धनगर, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), चोपडा यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले, तसेच जास्तीत जास्त दावे निकाली काढण्यासाठी आवाहन केले...

यावेळी सरकारी अभियोक्ता अॅड. नितीन माळी उपस्थित होते.याप्रसंगी न्यू चोपडा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सी. बी. सोनवणे तसेच वरिष्ठ वकील अॅड. प्रसाद काबरे, अॅड. डी. एस. सोनार, अॅड. आय. आर. पाटील, अॅड. किरण जाधव, अॅड. विशाल एस. पाटील, अॅड. दीपक पाटील आणि अॅड. विशाल शिंदे यांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी सहकार्य केले.

शेवटी श्री योगेश पाटील निवासी नायब तहसीलदार यांनी आभार व्यक्त केले व ग्राम महसुल अधिकारी श्री स्वप्निल कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संचालन केले...लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक महसूल अधिकारी श्री अरुण वसावे व श्रीमती वंदना दाभाडे यांनी परिश्रम घेतले...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने