शासकीय शालेय व्हॉलीबॉल चोपडा तालुकास्तर स्पर्धेत प्रताप विद्या मंदिराचा दणकेबाज विजय

 शासकीय शालेय व्हॉलीबॉल चोपडा तालुकास्तर स्पर्धेत  प्रताप विद्या मंदिराचा दणकेबाज विजय

चोपडा दि.२६(प्रतिनिधी)शैक्षणिक वर्ष 2026,27 च्या शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये चोपडा तालुकास्तरीय 14 वर्षे वयोगटाच्या मुलांच्या स्पर्धेत प्रताप विद्यामंदिर चोपडा येथील संघाने दणकेबाज कामगिरी करत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला. तर 17 वर्ष वयोगटात विद्यालयाच्या संघाने तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवीला.

 या खेळाडूंना विद्यालयातील क्रीडा शिक्षक नरेंद्र महाजन सर तसेच विद्यालयाचे माजी खेळाडू हर्षवर्धन पवार,शुभम साळी,प्रथमेश शिंदे,राज पाटील,आशुतोष तांबट यांचे मार्गदर्शन लाभले.

 सदर स्पर्धेत तालुका भरातून एकूण 14 संघांनी सहभाग नोंदविला. यातील अंतिम सामन्यात प्रताप विद्यामंदिराच्यासंघाने विजय संपादित केला. 

खेळाडूंच्या  या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,चेअरमन, सचिव, संस्था कार्यकारणी सदस्य,मुख्याध्यापक, समन्वयक, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी- विद्यार्थिनी यांच्याकडून कौतुक करण्यात येत असून जिल्हास्तरीय सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .

सदर खेळाडू हे जळगाव जिल्हा पातळीवर चोपडा तालुक्याचे नेतृत्व करतील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने