प्रताप विद्या मंदिर शाळेचे राज्यस्तरीय के.नारखेडे स्पर्धांमध्ये घवघवीत यश

 प्रताप विद्या मंदिर शाळेचे राज्यस्तरीय के.नारखेडे स्पर्धांमध्ये घवघवीत यश

चोपडा दि.२२(प्रतिनिधी)स्व.बाबासाहेब के नारखेडे यांच्या 46 व्या स्मृतीदिनानिमित्त *राज्यस्तरीय वक्तृत्व , गीत गायन, व निबंध स्पर्धा*  भुसावळ  येथील के नारखेडे विद्यालयात संपन्न झाल्यात.

त्यात प्रताप विद्या मंदिराने विजयी पताका दरवर्षाप्रमाणे फडकवित घवघवीत यश संपादन केले आहे.गट क्रमांक 1 (5 वी /6 वी) वक्तृत्व स्पर्धा यात *मनस्वी विजय गोसावी* (प्रताप इंग्लिश मिडीयम) हिने *राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक* तर गट क्रमांक 3(9 वी /10 वी) उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्या वर्षी इ. 10 वी चा विद्यार्थी *शिवराज अनिल पाटील* याने *राज्यस्तरीय प्रथम क्रमांक* प्राप्त केला.तर याच गटात 9 वी ची विद्यार्थिनी *वेदांशी गजानन पाटील* हिने राज्यस्तरीय तृतीय क्रमांक तर गट क्रमांक 4 (11 वी/12 वी) वक्तृत्व स्पर्धेमध्ये इ. 11 वी  ची विद्यार्थिनी *वैष्णवी सुनील चौधरी* हिने  *राज्यस्तरीय प्रथम क्रमांक* तर  गट क्रमांक4 (11 वी /12 वी) उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत 12 वी ची विद्यार्थिनी *कुंजन दिपक राजपूत* हिने *राज्यस्तरीय तृतीय क्रमांक*

तसेच  राज्यस्तर निबंध स्पर्धा  गट 4(11वी/12 वी)गटात *यशश्री विश्वनाथ चव्हाण* या 11 वी च्या विद्यार्थीनीने *राज्यस्तरीय प्रथम क्रमांक* प्राप्त केला.तसेच शिक्षकांसाठी आयोजित *काव्यलेखन* स्पर्धेत शाळेतील उपशिक्षिका *श्रीमती योगिता अशोकराव बोरसे* यांच्या 'मास्तर' या कवितेला *राज्यस्तरीय तृतीय क्रमांक* प्राप्त झाला.वरील राज्यस्तरीय स्पर्धेत 

आयुष दीपक भामरे , पूर्वा बडगुजर ,अविका कमलेश गायकवाड ,लक्षिता किरण पाटील ,स्वरा महेंद्र पाटील (गावातील विभाग) सृष्टी नरेंद्र महाजन ,कैस खान रजा खान (दुपार विभाग) यांनी वक्तृत्व स्पर्धेत तसेच आदिती कासार,ज्ञानवी पाटील(दुपार विभाग) यांनी सुगम संगीत प्रकारात यशस्वी सहभाग नोंदवला.या सर्व विद्यार्थ्यांना शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष *श्री,मकरंद नारखेडे* तसेच अभिष्ठाता उ.म.वि.जळगाव *साहेबराव भूकन* यांच्या हातून *रोख रक्कम,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र आणि पुस्तके* देऊन गौरवण्यात आले.या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक उपप्राचार्य जे.एस.शेलार सर,श्री.व्ही.ए.गोसावी सर,श्रीमती वाय.ए.बोरसे , कु.पी.एस.ठाकरे ,श्री.एम.एफ.माळी , श्री.पी.बी.कोळी  यांचे संस्थेचे अध्यक्ष   शैलाबेन मयूर उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल ,चेअरमन राजाभाई मयूर सचिव मा.माधुरीताई मयूर, संचालक चंद्रहास भाई,भूपेंद्रभाई,रमेशाभाई, मुख्याध्यापिका माधुरी पाटील मॅडम ,सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन आणि कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने