चोपडा महाविद्यालयात दोन दिवसीय 'जळगाव जिल्हा संशोधन प्रस्ताव सादरीकरण कार्यशाळेचे' आयोजन
चोपडा,दि.२२(प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब साहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२३ व २४ सप्टेंबर २०२६ रोजी चोपडा येथील दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयात दोन दिवसीय 'जळगाव जिल्हा संशोधन प्रस्ताव सादरीकरण कार्यशाळेचे' आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत संशोधनाचे विविध पैलू आणि पद्धतींवर मार्गदर्शन व चर्चा करण्यात येणार आहे.
या कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.डॉ.संध्या एम.सोनवणे ह्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार असून कार्यशाळेच्या उदघाटक म्हणून क.ब.चौ.उ.म.वि. जळगाव येथील व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ. श्रीमती सुरेखा पंडित पालवे ह्या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमप्रसंगी अतिथी म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिता संदीप पाटील तसेच जळगाव विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा.डॉ.प्रवीण महाले कार्यशाळेचे मार्गदर्शक व प्रमुख वक्ते विद्यार्थी विकास विभागाचे जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. संजय के. पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व मुळजी जेठा महाविद्यालयाचे सहा. प्राध्यापक डॉ. वसिम आर. शेख उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेच्या पहल्या सत्रात डॉ. संजय के. पाटील हे "अविष्कार संशोधन व सादरीकरणाच्या पद्धती" या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तर कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात डॉ. वसिम आर. शेख "संशोधनासाठी विषयाची निवड कशी करावी?" या महत्त्वपूर्ण विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रात समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथील सहा. प्राध्यापक मा. डॉ. विनोद ए. रायपूरे हे "संशोधन प्रस्तावा आराखडा तयार करणे" या विषयावर मार्गदर्शन करणार असून कार्यशाळेच्या चौथ्या सत्रात धनदाई महाविद्यालय अमळनेरचे प्राध्यापक प्रा.डॉ. लीलाधर एस. पाटील "संशोधनातील नैतिकता व वाङ्मय चौर्य (Plagiarism)" या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेचा समारोप कार्यक्रम प्रमुख अतिथी म्हणून क.ब.चौ.उ.म.वि. जळगाव येथील अधिसभा सदस्य प्रा.डॉ. संदीप बी.नेरकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तरी सदर कार्यशाळेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.डॉ.संध्या एम.सोनवणे तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.बी.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एम.सपकाळ, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, पंकज महाविद्यालय चोपडा येथील विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.दिलीप पाटील, समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथील विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.नारसिंग वळवी, कार्यशाळेचे समन्वयक व विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.आर.आर.पाटील व सह-समन्वयक प्रा.डॉ.सौ.पी.एम.रावतोळे यांनी केले आहे.
