धरणगाव तालुक्यात वर्ल्ड व्हिजन संस्थेचा वार्षिक मूल्यांकन कार्यक्रम
धरणगाव, दि.२६(प्रतिनिधी) : वर्ल्ड व्हिजन या सेवाभावी संस्थेच्या वतीने धरणगाव तालुक्यात वार्षिक मूल्यांकन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी बाल संरक्षण, शिक्षण, आरोग्य व पोषण, सुरक्षित पाणी व स्वच्छता, उपजीविका, बचत गट तसेच समुदाय सहभाग या विषयांवर करण्यात आलेल्या कामाची माहिती घेण्यात आली. विविध उपक्रमांमुळे बालक, महिला आणि कुटुंबांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांचाही आढावा घेण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान वर्षभरातील उपलब्धी, अडचणी, अनुभव आणि शिकवण यावर चर्चा करण्यात आली. तसेच आगामी वर्षात समुदायाच्या गरजा लक्षात घेऊन विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास वर्ल्ड व्हिजन संस्थेचे अधिकारी जितेंद्र गोरे सर व कर्मचारी, राजेश वायदांडेकर सुशीला वडवी, प्रथम कांबळे स्वयंसेवक आरती पाटील वैष्णवी पाटील जितेंद्र पाटील रोशनी मोरे गावातील समुदायातील प्रतिनिधी, बचत गटाच्या महिला, बाल संरक्षण समितीचे सदस्य तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून समुदायाच्या सहभागातून बालक व कुटुंबांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अधिक बळ मिळाले.
