मुंबई यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे ४ऑक्टोंबरला चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाचा होणार सन्मान
चोपडा दि.२१(प्रतिनिधी): चोपडा ज्येष्ठ नागरिक संघास यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईच्याआरोग्य, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक विभागातर्फे 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मान- २०२६' साठी सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे.
सदर सन्मान प्रदान सोहळा रविवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी, यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईच्या मुख्य सभागृहामध्ये सकाळी ८ ते दुपारी २.०० यावेळेत आयोजित करण्यात आला आहे.
या सन्मान सोहळ्यास सर्वोच्च न्यायालायाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले असून यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तरी या सोहळ्यास प्रत्यक्ष उपस्थित राहून सन्मान स्वीकारावा ही विनंती संयोजक विजय कान्हेकर विभाग प्रमुख दिपिका शेरखाने यांनी एका निमंत्रण पत्रकान्वये केली आहे.
