महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत धरणगाव शहरात निर्माल्य संकलन
धरणगाव दि.२१(प्रतिनिधी)महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत धरणगाव येथे गणपती विसर्जना निमित्त श्री बैठकीतील श्रीसदस्य मार्फत निर्माल्य संकलन करण्यात आले त्यात एकूण निर्माल्य 7 क्विंटल संकलन झाले. निर्माल्य संकलनासाठी श्रीबैठक धरणगाव, श्रीबैठक एकलग्न, श्रीबैठक बिलखेडा ,श्रीबैठक सोनवद , श्री बैठक पाळधी येथील एकूण 139 श्री सदस्यांनी सहभाग नोंदविला.
दरवर्षा प्रमाणे निर्माल्य संकलन सकाळी 11वाजेपासून ते रात्री 11 वाजून 30 मिनिटांपर्यंत अखंडित सेवा श्रीसदस्यांनी केली त्यात वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावून जसे जुनी नगरपालिका गांधी उद्यान, तेली तलाव सिद्धी हनुमान मंदिर, चोपडा अमळनेर फाटा जवळ स्टॉल लावण्यात आले डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, प्रौढ साक्षरता वर्ग, बाल संस्कार केंद्र, वृक्ष लागवड व संवर्धन, स्वच्छता अभियान विहिरीतील गाळ काढणे बोरवेल व विहीर पुनर्भरण असे विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येतात याची दखल घेऊन शासनाने पद्मश्री आदरणीय डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने स्वच्छता दूत म्हणून नियुक्त केले आहे. याप्रसंगी सकाळी 11वाजता उद्घाटनाप्रसंगी धरणगाव शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सो लीलाताई सुरेश चौधरी, निलेश चौधरी नगरसेवक श्री कैलास माळी सर, अग्निहोत्री ताई नगरसेविका असे अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली.
