चोपडा येथील दादासाहेब डॉ.सुरेश जी जी.पाटील महाविद्यालयात तृतीय वर्ष कला मराठी पाचव्या सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारित विद्यापीठस्तरीय चर्चासत्राचे आयोजन

 चोपडा येथील दादासाहेब डॉ.सुरेश जी जी.पाटील महाविद्यालयात तृतीय वर्ष कला मराठी पाचव्या सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारित  विद्यापीठस्तरीय चर्चासत्राचे आयोजन


चोपडा,दि.१७(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील मराठी विभाग आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय वर्ष कला मराठी  (NEP-2020) पाचव्या सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारित विद्यापीठस्तरीय चर्चासत्राचे आयोजन दि. १९ सप्टेंबर, २०२६ (शनिवार) रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आलेले आहे.

      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील  उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे उदघाटन शिंदखेडा येथील साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आशुतोष आर.पाटील यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून  महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ.सौ.स्मिता संदीप पाटील उपस्थित राहणार आहेत.

      या चर्चासत्रात तृतीय वर्ष कला मराठी अभ्यासक्रमास नेमलेल्या अभ्यासक्रमाशी निगडीत  अभ्यासपत्रिकांवर संशोधकांनी लिहिलेल्या ६० हून अधिक विषयांवरील शोधनिबंधांद्वारे चर्चा केली जाणार असून ५७ शोधनिबंध समाविष्ट असलेल्या 'साहित्य: आकलन, आस्वाद आणि समीक्षा' या अक्षरधारा आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नल्सचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

      या चर्चासत्राच्या उदघाटन सत्रानंतर तीन सत्रात विविध महाविद्यालयांमधून सहभागी झालेले अभ्यासक व निबंधवाचक शोधनिबंधांचे सादरीकरण करणार आहेत. यात पहिल्या सत्राचे अध्यक्ष म्हणून शिरपूर येथील एस.पी. डी.एम.महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.फुला बागुल, दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष म्हणून कुसुंबा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रा.डॉ.जितेंद्र गिरासे उपस्थित राहणार असून समारोप सत्राध्यक्ष म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा.डॉ.जगदीश पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

       या चर्चासत्रामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव परिक्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर महाविद्यालयांमधील प्राध्यापक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.संध्या एम.सोनवणे, चर्चासत्र समन्वयक, उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ.ए.बी.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एम.सपकाळ, महाविद्यालय समन्वयक डॉ.एस.ए.वाघ तसेच चर्चासत्र सह-समन्वयक डॉ.एम.एल.भुसारे यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने