श्री संत शिरोमणी संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यात कु. साक्षी खुशाल मांडगे हिचा सत्कार
धरणगाव,दि.११(प्रतिनिधी) : शिंपी समाजाच्या वतीने धरणगाव येथे श्री संत शिरोमणी संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या कु. साक्षी खुशाल मांडगे हिचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कु. साक्षी खुशाल मांडगे हिने बी.कॉम. परीक्षेत ८१ टक्के गुण मिळवत विद्यापीठात पाचवा क्रमांक पटकावल्याबद्दल तिचा विशेष गौरव करण्यात आला. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्षा लिलाबाई सुरेश चौधरी उपस्थित होत्या. तसेच उपनेते गुलाबरावजी वाघ साहेब, चर्मकार समाज अध्यक्ष भानुदासजी विसावे, लोकप्रिय नगरसेवक सुनील पंढरीनाथ चौधरी, किरण अग्निहोत्री, लक्ष्मण पाटील सर, नगरसेविका मंदाकिनी ललित येवले, विनय (पप्पू) भावे, विलास महाजन, पवन महाजन, पप्पू कंखरे यांच्यासह शिंपी समाजाचे अध्यक्ष मोहनदादा मांडगे, उपाध्यक्ष, सचिव तसेच पंचमंडळातील सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
संत नामदेव महाराजांच्या विचारांचा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यात कु. साक्षी खुशाल मांडगे हिचा झालेला सत्कार समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. तिच्या उल्लेखनीय यशाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
